Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा आणि वडिलांमधील वाद नेमका काय आहे?

रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंग यांनी गुजराती वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुलगा रवींद्र आणि सुनेवर आरोप केले आहेत. 

383
Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा आणि वडिलांमधील वाद नेमका काय आहे?
  • ऋजुता लुकतुके

दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या खाजगी जीवनातील एका घटनेमुळे चर्चेत आला आहे. नुकतीच त्याचे वडील अनिरुद्ध सिंग जडेजा यांनी एका गुजराती दैनिकाला मुलाखत दिली. आणि यात रवींद्र जडेजाचं (Ravindra Jadeja) लग्न झाल्यापासून आपला आणि आपल्या मुलाचा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. (Ravindra Jadeja)

या घरगुती वादात आता रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) पत्नी रिवाबाची बाजू घेतली आहे. आणि ‘खोट्या मुलाखतींकडे दुर्लक्षच केलेलं बरं,’ असं त्याने ट्वीटरवर म्हटलं आहे. आपली प्रतिक्रिया त्याने गुजराती भाषेतही दिली आहे. दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अनिरुद्ध यांनी कुटुंबातील घरगुती कलहाचं वर्णन केलं होतं. आणि त्यासाठी रवींद्रची पत्नी रिवाबाला दोषी धरलं होतं. अलीकडे आपले मुलगा रवींद्रशी कुठलेही संबंध उरलेले नाहीत, असं ते या मुलाखतीत म्हणाले. (Ravindra Jadeja)

‘त्यांच्या लग्नानंतर काही दिवसांतच घरी हॉटेलच्या मालकीवरून वाद निर्माण झाला. रिवाबाने हॉटेल तिच्या नावावर करून दे असं रवींद्रला (Ravindra Jadeja) सांगितलं. त्यावरुन दोघांमध्ये वादही झाला होता,’ असं वडिलांचं मुलाखतीतील एक विधान आहे. वडिलांनी नंतर असंही सांगितलं आहे की, ‘ते आता एकटे राहतात. आणि पत्नीनंतर त्यांना मिळणाऱ्या २०,००० रुपयांच्या निवृत्ती वेतनावर त्यांची गुजराण होते.’ (Ravindra Jadeja)

या मुलाखतीनंतर लगेचच बंगळुरुमध्ये उपचार घेत असलेल्या रवींद्र जडेजाने ट्विटरवरून उत्तर दिलंय. (Ravindra Jadeja)

(हेही वाचा – Uddhav Thackeray : अभिषेक घोसाळकर आणि मॉरिशला दुसऱ्या कुणी तरी गोळ्या झाडल्या का? उद्धव ठाकरेंचा यांचा सवाल)

जडेजा तिसऱ्या राजकोट कसोटीत खेळण्याची दाट शक्यता

उत्तरादाखल केलेल्या ट्विटमध्ये जडेजा (Ravindra Jadeja) म्हणतो, ‘ती मुलाखतच मूर्खपणाची आहे. आणि त्यात सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खोट्या आणि तथ्यहीन आहेत. मुलाखतीत सांगितल्या सगळ्या गोष्टी एकतर्फी आहेत. आणि मी आणि पत्नीवर केलेले आरोप मी फेटाळतो. मलाही बरंच काही सांगायचं आहे. पण, ते मी जाहीरपणे सांगणार नाही. माझ्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे केलं जातंय. आणि हे चुकीचं आहे.’ (Ravindra Jadeja)

रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या बहिणीशीही संबंध ठेवले नसल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. रवींद्र जडेजा पहिल्या कसोटीत झालेल्या दुखापतीतून सावरतोय. दुसरी कसोटी तो खेळू शकला नव्हता. आणि बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तो उपचार घेत आहे. पण, आता तो तंदुरुस्त होत असून तिसऱ्या राजकोट कसोटीत खेळण्याची दाट शक्यता आहे. (Ravindra Jadeja)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.