ऋजुता लुकतुके
Ravindra Jadeja आयसीसीच्या क्रमवारीत सर्वाधिक दिवस अव्वल क्रमांकावर राहिलेला अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. कसोटीत त्याने ही कामगिरी केली आहे. तो एकूण ११५१ दिवस म्हणजे ३८ महिने कसोटी क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल होता. गेल्या वर्षी जडेजाने शानदार कामगिरी केली आणि २९.२७ च्या सरासरीने ५२७ धावा केल्या. तसेच २४.२९ च्या सरासरीने ४८ बळीही घेतले. जडेजाने जॅक कॅलिस, कपिल देव, इम्रान खान सारख्या खेळाडूंना मागे टाकले. ९ मार्च २०२२ रोजी तो रँकिंगमध्ये अव्वल (ICC Top ranking) स्थानावर होता. तिथपासून हे स्थान त्याने सोडलेलं नाही. (Ravindra Jadeja)
Record Alert 🚨
Say hello 👋 to the longest-reigning Number 1⃣ All-rounder in Tests!
Congratulations, Ravindra Jadeja 🫡#TeamIndia | @imjadeja pic.twitter.com/tCVPBOEw3Y
— BCCI (@BCCI) May 15, 2025
बुधवारी जाहीर झालेल्या कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत, जडेजा ४०० रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर बांगलादेशचा मेहदी हसन मिराज (३२७ गुण) आणि मार्को यान्सेन (२९४ गुण) यांचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि बांगलादेशचा शकिब अल हसन यांचा टॉप ५ मध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे, जडेजा हा अव्वल १० मध्ये असलेला एकमेव भारतीय अष्टपैलू खेळाडू आहे.
(हेही वाचा – पाकचे पंतप्रधान Shahbaz Sharif म्हणाले; आम्ही शांततेसाठी चर्चा करण्यास तयार; भारतानेही जाहीर केली भूमिका)
मार्च २०२२ मध्ये जाडेजा नंबर-१ रँकिंगवर पोहोचला. तेव्हापासून, जाडेजाने २३ कसोटी सामन्यांमध्ये ११७५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सरासरी ३६.७१ होती. यामध्ये ३ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत, त्याने फिरकी गोलंदाजीने २२.३४ च्या सरासरीने ९१ बळी घेतले, यात त्याने डावांत ५ बळी टिपण्याची कामगिरी ६ वेळा केली. तर दोनदा सामन्यांत १० बळी टिपले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community