-
ऋजुता लुकतुके
गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शनला भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीने जोरदार पाठिंबा देऊ केला आहे. साई सुदर्शन सारखा फलंदाज इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात हवा, असं रवी शास्त्रीने म्हटलं आहे. आयपीएलमध्ये त्याचा फॉर्म आणि फलंदाजीतील तंत्रशुद्धता याचा उपयोग इंग्लिश खेळपट्ट्यांवर त्याला होईल, असं शास्त्रीला वाटतं. आयपीएलमध्ये आतापर्यंत साई सुदर्शनने १० सामन्यांत ५०४ धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपही त्याच्याच नावावर आहे. (Ravi Shastri on Sai Sudarshan)
आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे आणि तिथे भारतीय संघ पाच कसोटींची मालिका खेळणार आहे. या मालिकेपासून नवीन आयसीसी कसोटी अजिंक्यपद हंगामालाही सुरुवात होईल. आपल्या साप्ताहिक आयसीसी रिव्ह्यू या पॉडकास्टमध्ये रवी शास्त्रीने या दौऱ्यासाठी भारतीय तयारीवर भाष्य केलं आहे. आणि त्यात साई सुदर्शनचा विषय त्याने सगळ्यात आधी उचलला आहे. (Ravi Shastri on Sai Sudarshan)
(हेही वाचा – India Vs Pakistan War : पाकिस्तानने दिली पाचव्यांदा क्षेपणास्त्र चाचणीची पोकळ धमकी !)
Gujarat Titans’ batting in #IPL2025 has been a class apart.
Gill, Sai Sudharsan & Buttler – the top three have scored 76% of the GT’s runs averaging almost 60.
On the other hand, GT’s middle & lower order batters have been striking at 169 – the highest of all teams. #GTvSRH pic.twitter.com/wD52EOHUox
— The CricViz Analyst (@cricvizanalyst) May 2, 2025
‘साई सुदर्शन तीनही प्रकार खेळू शकेल, असा क्रिकेटपटू आहे आणि माझं त्याच्यावर नक्कीच लक्ष असेल. त्याच्याकडे गुणवत्ता आहे. तो डावखुरा आहे. इंग्लंडमध्ये यापूर्वी खेळलेला आहे आणि तिथलं वातावरण पाहता, संघात त्याला स्थान मिळायला पाहिजे, असं मला वाटतं आणि त्याच्या नावाची चर्चा नक्कीच होईल,’ असं रवी शास्त्रीने बोलून दाखवलं. सुदर्शन बरोबरच श्रेयस अय्यरही भारतीय संघात परतावा अशी इच्छा त्याने बोलून दाखवली. गोलंदाजांमध्ये भारताचं तेज त्रिकुट तयार झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. (Ravi Shastri on Sai Sudarshan)
‘बुमराह, सिराज आणि शमी तिघेही तंदुरुस्त आहेत ही खूपच जमेची गोष्ट आहे. आता मला असा गोलंदाज हवा आहे जो डावखुरा तेज गोलंदाज असेल. त्यासाठी अर्शदीप कसोटीत कशी कामगिरी करतो यावर माझं लक्ष असेल आणि निदान एखादा डावखुरा गोलंदाज सहावा गोलंदाज म्हणून मी खेळवेनच. त्याचा इंग्लंडमध्ये उपयोग होऊ शकतो,’ असं रवी शास्त्री शेवटी म्हणाला. अर्शदीप बरोबरच त्याने खलिल अहमदचंही नाव घेतलं. (Ravi Shastri on Sai Sudarshan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community