- ऋजुता लुकतुके
दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळताना रविवारी के एल राहुलने (KL Rahul) शानदार शतक झळकवलं. या हंगामातील शतक झळकवणारा तो पहिला उजव्या हाताचा फलंदाज आहे. त्याची कामगिरी दिल्लीला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली. पण, हे शतक आणि एकूणच या हंगामातील कामगिरी यामुळे के एल राहुल भारताच्या राष्ट्रीय टी-२० संघात परतण्याची शक्यता वाढली आहे. इंग्लंड (England) दौरा संपल्यानंतर भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी एकदिवसीय तसंच टी-२० साठीही के एल राहुलचा विचार होणार आहे. (KL Rahul For T20)
बरोबर अडीच वर्षांपूर्वी टी-२० विश्वचषकाच्या (T20 World Cup) उपान्त्य फेरीत राहुल शेवटचा भारताकडून टी-२० सामना खेळला होता. या सामन्यात रोहितबरोबर सलामीला येताना त्याने ५ चेंडूंत ५ धावा केल्या होत्या. इंग्लंडने या सामन्यात भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. एकूणच त्या स्पर्धेत राहुलने ७ सामन्यांत २१ धावांची सरासरी आणि १२० धावांच्या स्ट्राईक रेटसह १२८ धावा केल्या होत्या. या खराब कामगिरीनंतर टी-२० साठी पुन्हा त्याचा विचार झालेला नाही.
(हेही वाचा – Jyoti Malhotra : देशाशी गद्दारी करणाऱ्यांना काय शिक्षा मिळते ? वाचा सविस्तर …)
Fifth IPL hundred from the bat of the beast 🥵 pic.twitter.com/Rl1YpMJBdW
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 18, 2025
पण, मागच्या ६ महिन्यांत राहुलने मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं आहे. भारतासाठी तो सातत्याने धावा करत आहे. संघातील एक जबाबदार फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून त्याने लौकिक मिळवला आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) रविवारी त्याने ६५ चेंडूंत ११२ धावा करताना ४ षटकार आणि १४ चौकार लगावले. त्याने दिल्लीला एकहाती दोनशे धावा गाठून दिल्या. ही कामगिरी करताना त्याने भारताकडून ८,००० टी-२० धावा करणारा सर्वात वेगवान फलंदाज होण्याचा मानही पटकावला आहे. विराट कोहलीला (Virat Kohli) त्याने या बाबतीत मागे टाकलं आहे.
राहुल हा उपयुक्त खेळाडू म्हणून ओळखला जातो. तो कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. जोडीने पूर्ण दिवस यष्टीरक्षण करू शकतो. आणि गरजेप्रमाणे फटकेबाजी करू शकतो. त्यामुळे २०२६ च्या टी-२० विश्वचषकाची तयारी सुरू असताना के एल राहुलचं नाव आता आघाडीवर घेतलं जात आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यात भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा होणार आहे. (KL Rahul For T20)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community