Rafael Nadal : फेब्रुवारीत कतार ओपनमध्ये नदाल पुन्हा कोर्टवर उतरणार

३७ वर्षीय स्पॅनिश सुपरस्टारला ऑस्ट्रेलियन ओपनमधून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. 

124
Rafael Nadal : बार्सिलोना ओपनमध्ये राफेल नदालचं आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात
  • ऋजुता लुकतुके

दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) टेनिस कोर्टवर पुनरागमन करण्याचा एक निकराचा प्रयत्न फेब्रुवारीत करणार आहे. १९ फेब्रुवारीत दोहा इथं होणाऱ्या कतार ओपन चषकात तो खेळणार आहे. ही एटीपीची २५० रेटिंग गुण असलेली स्पर्धा आहे. २०२३ चं अख्खं वर्ष दुखापतीमुळे कोर्ट बाहेर गेलेलं असताना यावर्षी ब्रिस्बेन ओपन स्पर्धेतून त्याने पुनरागमनाचा प्रयत्न केला होता. ऑस्ट्रेलियन ओपनही खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. (Rafael Nadal)

पण, ब्रिस्बेनमध्ये उपउपांत्य फेरीत त्याचा पराभव झाला. आणि त्या सामन्यादरम्यान त्याला मांडीचा स्नायू त्रास देत होता. त्याने वैद्यकीय उपचारांसाठी सामना सुरू असताना ब्रेकही घेतला. आणि त्यानंतर त्याला माघारीचा कटू निर्णय घ्यावा लागला. वैद्यकीय स्कॅनिंगमध्ये स्नायू थोडासा तुटल्याचं समोर आलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्याचा निर्णय बदलून त्याला स्पेनला परतावं लागलं. त्यानंतर दोन आठवड्यांची विश्रांती घेऊन आता नदाल (Rafael Nadal) पुन्हा कोर्टवर येण्याची तयारी करताना दिसतोय. (Rafael Nadal)

(हेही वाचा – Manoj Jarange-Patil: मनोज जरांगेंच्या पुण्यातील सभेला लाखोंचा जनसमुदाय, पदयात्रा मुंबईच्या दिशेने रवाना)

कतार आणि एकूणच आखाती देशांबरोबर नदालचे (Rafael Nadal) जुने संबंध आहेत. अलीकडेच नदालला आखाती देशांनी टेनिसचा ब्रँड अँबेसिडर केला आहे. या देशांमध्ये टेनिसची लोकप्रियता वाढावी यासाठी नदालने (Rafael Nadal) इथं थोडा जास्त वेळ घालवावा असं या देशांना वाटतं. त्यानुसार नदालने (Rafael Nadal) पुनरागमनासाठी कतार ओपनची निवड केली आहे. (Rafael Nadal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.