आठ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ मध्ये रोलँड गॅरोसवर फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात राफेल नदालने (Rafael Nadal) वापरलेली बाबोलॅट रॅकेट रविवारी प्रेस्टिज मेमोरेबिलिया लिलावात ४९.१२ लाख रुपये या विक्रमी किंमतीला विकली गेली. लिलावात विकली गेलेली ही सर्वात महागडी रॅकेट ठरली आहे.
(हेही वाचा – Mumbra Train Accident : मानवी हक्क आयोगाकडे तक्रार; दुर्घटना प्रकरणी चौकशीची मागणी)
या विक्रमी लिलावासह राफेल नदालच्या (Rafael Nadal) रॅकेटचाच भारतीय रुपयांप्रमाणे ११.९६ लाखांचा विक्रम मागे पडला आहे. २०२३ मध्ये सोथेबीजमध्ये २०२२ च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये वापरलेली रॅकेट विकून मिळवला होता. या सामन्यात राफेल नदालने अंतिम फेरीत डॅनियल मेदवेदेवला पराभूत केले होते.
(हेही वाचा – Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय वाचा एका क्लिकवर…)
२०१७ मध्ये, राफेल नदालने (Rafael Nadal) स्टानिसलास वावरिंकला सरळ सेटमध्ये ६-२, ६-३, ६-१ ने पराभूत करत १० व्या फ्रेंच ओपन अजिंक्यपदाला गवसणी घातली होती. हा विजय त्याच्यासाठी अधिक महत्त्वाचा होता. कारण त्याने २०२४ मध्ये व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होण्यापूर्वी आपल्या टेनिस कारकिर्दीत चार वेळा जिंकलेल्या विजेतेपदांमध्ये एकही सेट गमावला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community