PM Modi on Mumbai Visit : पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर; आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाचे करणार उद्घाटन 

संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान मोदी बीकेसीमधील जिओ वर्ल्डच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.

66
PM Modi on Mumbai Visit : पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर; आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाचे करणार उद्घाटन 
PM Modi on Mumbai Visit : पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर; आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाचे करणार उद्घाटन 

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) यंदा 141 वे अधिवेशन भारतात आयोजित केले आहे. (PM Modi on Mumbai Visit) जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी, क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि ऑलिम्पिक आदर्शांना पुढे नेण्यासाठी हे अधिवेशन होत आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आणि IOC चे इतर सदस्य, भारतीय ऑलिम्पिक संघटनेसह विविध क्रीडा महासंघांचे प्रमुख भारतीय क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि इतर काही प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. (PM Modi on Mumbai Visit)

(हेही वाचा – Sleep : झोप पूर्ण झाली नसल्याने होऊ शकतात अनेक आजार, काय आहे यावर उपाय?)

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यांची प्रमुख बैठक पार पडणार आहे. ऑलिम्पिक खेळांच्या भविष्याबाबत महत्त्वाचे निर्णय आयओसी अधिवेशनामध्ये घेतले जातात.

यापूर्वी नवी दिल्ली येथे झाले होते अधिवेशन

भारत दुसऱ्यांदा आणि सुमारे 40 वर्षांच्या कालावधीनंतर IOC सत्राचे आयोजन करत आहे. IOC चे 86 वे अधिवेशन यापूर्वी 1983 मध्ये नवी दिल्ली येथे पार पडले होते. हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांमध्ये आयओसीच्या सत्राबद्दल उत्सुकता आहे.

क्रीडा क्षेत्रातील दिग्गज

आयओसी अ‍ॅथलीट्स कमिशनचे सदस्य आणि भारताचा आघाडीचा नेमबाज अभिनव बिंद्रा यासंदर्भात म्हणाला की, आयओसी सत्र भारतातील तरुणांना ऑलिम्पिक चळवळ अधिक जवळून समजून घेण्यास मदत करू शकते. मुंबईतील आयओसी अधिवेशनात ऑलिम्पिकशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. त्यात भविष्यातील ऑलिम्पिक खेळांचा समावेश आणि वगळण्याशी संबंधित निर्णय होऊ शकतात. (PM Modi on Mumbai Visit)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.