PBKS Vs DC : दिल्लीने पंजाबचा 6 गडी राखून केला पराभव ; समीर रिझवीचं वादळी अर्धशतक

PBKS Vs DC : दिल्लीने पंजाबचा 6 गडी राखून केला पराभव ; समीर रिझवीचं वादळी अर्धशतक

79
PBKS Vs DC : दिल्लीने पंजाबचा 6 गडी राखून केला पराभव ; समीर रिझवीचं वादळी अर्धशतक
PBKS Vs DC : दिल्लीने पंजाबचा 6 गडी राखून केला पराभव ; समीर रिझवीचं वादळी अर्धशतक

आयपीएल २०२५ स्पर्धेतील ६६ वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS Vs DC ) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जने २० षटकांअखेर ८ गडी बाद २०६ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना करूण नायरने महत्वपूर्ण खेळी केली. शेवटी ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवीने मिळून दिल्लीला विजय मिळवून दिला. (PBKS Vs DC )

समीर रिझवी आणि करुण नायर यांच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या षटकात 207 धावांचे मोठे लक्ष्य गाठले. यासह, दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या हंगामाचा शेवट एका शानदार विजयाने केला. दिल्ली एकूण 15 गुणांसह पाचव्या स्थानावर राहिली. फॉर्ममध्ये असलेला फलंदाज प्रियांश आर्य काही खास कामगिरी करू शकला नाही. तो फक्त 6 धावा करून आऊट झाला. मुस्तफिजूर रहमानने त्याची विकेट घेतली. पण, प्रभसिमरन सिंग (28) आणि जोश इंग्लिश (32) यांनी स्फोटक फलंदाजी केली आणि दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांच्या विकेट विप्रज निगमने घेतल्या. एकूण 77 धावांपर्यंत पंजाबने आपल्या तीन फलंदाजांच्या विकेट गमावल्या होत्या. (PBKS Vs DC)

207 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. केएल राहुल आणि फाफ डु प्लेसिस यांनी आक्रमक सुरुवात केली. पण दिल्लीला पहिला धक्का सहाव्या षटकात बसला, जेव्हा केएल राहुलची विकेट पडली. केएल राहुलने 35 धावा केल्या. यानंतर, सातव्या षटकात फाफची विकेटही पडली. फाफने 23 धावा केल्या, त्याच वेळी अटलनेही चांगली फलंदाजी केली आणि 22 धावा केल्या, पण 11 व्या षटकात त्याची विकेट पडली. पण यानंतर समीर रिझवी आणि करुण नायर यांच्यात चांगली भागीदारी झाली. पण 15 व्या षटकात करुण नायरची विकेट पडली. नायरने 27 चेंडूत 44 धावा केल्या. नायर आऊट झाला तेव्हा दिल्लीला विजयासाठी 5 षटकांत 52 धावांची आवश्यकता होती. (PBKS Vs DC)

पण समीर रिझवी एका टोकालाच उभा राहिला. त्याच वेळी, स्टब्सने त्याला खूप चांगले साथ दिली. दिल्लीला शेवटच्या दोन षटकांत जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता होती. दरम्यान, समीर रिझवीने आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने फक्त 22 चेंडूत अर्धशतक झळकावले. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता होती. अखेर दिल्लीने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. (PBKS Vs DC )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.