Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या पदकांमध्ये असणार आयफेल टॉवरचा अंश

पॅरिस ऑलिम्पिकच्या आयोजकांनी स्पर्धेसाठीच्या पदकांचं अनावरण केलं आहे. 

172
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या पदकांमध्ये असणार आयफेल टॉवरचा अंश
  • ऋजुता लुकतुके

यावर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीची पदकं ही इतर ऑलिम्पिकपेक्षा थोडी वेगळी आणि पॅरिस शहराचा ठसा उमटवणारी असणार आहेत. ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिकसाठी एकूण ५,०८४ पदकं तयार करण्यात आली आहेत. ती षटकोनी आकाराची आहेत. आणि या पदकांसाठी वापरलेलं लोह हे मूळ आयफेल टॉवरमधील (Eiffel Tower) आहे. या पदकांच्या मध्यभागीही आयफेल टॉवर (Eiffel Tower) विराजमान झाला आहे. (Paris Olympic 2024)

पॅरिस ही जागतिक फॅशन उद्योगाची राजधानी मानली जाते. त्यामुळे इथे बनलेली ही पदकंही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या सर्व पदकांमध्ये एक मौल्यवान धातू आहे. आणि तो बनवलाय इथल्या प्रसिद्ध शॉमे चेनच्या कारागीरांनी. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – World Book Fair : जागतिक पुस्तक मेळा शनिवारपासून; १६ देशांचा सहभाग)

अशी केली आहे पदकांची रचना 

‘ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळातील विजेत्यांना काही संस्मरणीय भेट देण्याचा आमचा मानस होता. त्यासाठी १८८९ च्या आयफेल टॉवरसाठी (Eiffel Tower) वापलेलं लोखंड या पदकांसाठी वापरण्याचं आम्ही ठरवलं,’ असं आयोजन समितीचे प्रमुख टोनी एस्टोगे यांनी सांगितलं. शॉमे ब्रँड १७८० पासून फ्रेंच राज्यकर्ते आणि त्यांच्या सरदारांसाठी दागिने घडवत आला आहे. (Paris Olympic 2024)

आताही पदकं बनवताना त्यांनी अशी रचना केली आहे की, ऑलिम्पिक रिंग्स प्रकाश किरण आकर्षित करतील आणि सूर्यकिरण पडल्यावर ते परावर्तितही होतील. त्यामुळे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य धातूंनी बनलेली ही पदकं लकाकणारीही असतील. आयफेल टॉवरला (Eiffel Tower) फ्रान्समध्ये कौतुकाने ‘ओल्ड लेडी’ किंवा ‘आयर्न लेडी’ म्हटलं जातं. दरवर्षी या ऐतिहासिक इमारतीची डागडुजी करताना टॉवरच्या पिलरचं काही लोखंड काढून घेण्यात येतं. तेच लोखंड पदकांमध्ये वापरलं आहे. शिवाय पदकांचा आकार चौकोनी ठेवताना सहा कोनांमध्ये या प्रसिद्ध टॉवरवर असलेल्या कमानींचे आकार कोरण्यात आले आहेत. (Paris Olympic 2024)

२००४ सालापासून ऑलिम्पिक पदकांच्या मागच्या बाजूला ग्रीक देवी नायकीचं चित्र कोरलेलं असतं. ही देवी ॲथेन्सच्या पहिल्या ऑलिम्पिक स्टेडिअममध्ये प्रवेश करतानाचं चित्र पदकांवर कोरलेलं असतं. पण, यंदा आयोजकांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेची परवानगी घेऊन पदकांवर आयफेल टॉवर (Eiffel Tower) कोरण्याची परवानगी मिळवली आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.