Pakistan Super League : पाकिस्तानची आणखी नाचक्की; युएईचा पीएसएल भरवायला नकार

Pakistan Super League : आता पाकिस्तानही स्पर्धा पुढे ढकलण्यावर विचार करत आहे.

55
Pakistan Super League : पाकिस्तानची आणखी नाचक्की; युएईचा पीएसएल भरवायला नकार
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली आहे. संयुक्त अरब अमिरातने पाकिस्तान सुपर लीगचे सामने दुबईत आयोजित करण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएलचे उर्वरित सामने दुबईत होणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आता यूएईने पाकिस्तान सुपर लीगचे सामने आयोजित करण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे भारता आता आयपीएल पुन्हा सुरू करण्यावर चर्चा सुरू झाली आहे. (Pakistan Super League)

पीएसएलचे केवळ ८ सामने बाकी राहिले आहेत. ८ मे रोजी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमजवळ हल्ल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पीएसएलने ८ मे रोजीचा सामना रद्द केला आहे. रावळपिडींत कराची किंग्ज आणि पेशावर जाल्मी यांच्यात लढत होणार होती. मात्र, ती रद्द करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पीएसएलचे उर्वरित सामने दुबईत आयोजित करण्याचं जाहीर केलं होतं. (Pakistan Super League)

(हेही वाचा – SSC Result : ‘या’ दिवशी दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता)

संयुक्त अरब अमिरातकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला तोंडावर पाडण्यात आलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं संयुक्त अरब अमिरातची परवानगी न घेता किंवा त्यांना न कळवता पीएसएलचे सामने दुबईत घेण्याची घोषणा केली असावी. आता भारत – पाक युद्ध थांबल्यामुळे पाकिस्तानही मायदेशातच स्पर्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. पण, तिथल्या स्टेडिअमचं नुकसान झालं आहे. त्यामुळे स्टेडिअमची अवस्था पाहून ते स्पर्धा पूर्ण करण्यावर निर्णय घेतली. (Pakistan Super League)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान आमने सामने आले आहेत. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाक व्याप्त जम्मू काश्मीरमधील एकूण ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला होता. त्यानंतर पाकिस्तान बिथरला असून त्यांच्याकडून ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत. भारताकडून ते ड्रोन पाडले जात आहेत. (Pakistan Super League)

(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराने कप्तानीवरून घेतला हा महत्त्वाचा निर्णय)

दरम्यान, भारतानं देखील आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित केलं आहे. नवं वेळापत्रक नंतर जाहीर केलं जाणार आहे. या दरम्यान इंग्लंडनं आयपीएलच्या राहिलेल्या सामन्यांचं आयोजन करण्याची तयारी दर्शवली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेला आहे. जगभरातील विविध देशांनी भारतासोबत उभे राहत पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रय देऊ नये, असं म्हटलं होतं. (Pakistan Super League)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.