Pakistan Cricket : चॅम्पियन्स स्पर्धेनंतरही पाक मंडळाकडे पैसे नाहीतच, खेळाडूंचं मानधनही कापलं?

Pakistan Cricket : खेळाडूंचं मानधन अगदी ७० टक्क्यांपर्यंत कापलं जाणार आहे.

108
Pakistan Cricket : चॅम्पियन्स स्पर्धेनंतरही पाक मंडळाकडे पैसे नाहीतच, खेळाडूंचं मानधनही कापलं?
  • ऋजुता लुकतुके

अलीकडेच चॅम्पियन्स करंडकासारखी महत्त्वाची स्पर्धा पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती इथं संयुक्तपणे पार पडली. खुद्द पाकिस्तान संघाची कामगिरी लाजिरवाणी असली तरी आर्थिक डबघाईला आलेल्या पाक क्रिकेट मंडळाला यातून चांगल्या आर्थिक कमाईची अपेक्षा होती. पण, नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानने देशांतर्गत स्पर्धेसाठी खेळाडूंच्या मानधनामध्ये तब्बल ७० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. अर्थात, यावर आता उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. पीसीबीकडून अधिकृत कोणतंही स्पष्टीकरण मिळालेलं नाही. किंवा अधिकृतपणे पगार कपातीची बातमीही आलेली नाही. पण, चर्चा मात्र सगळीकडे आहे. (Pakistan Cricket)

पीसीबीने आगामी राष्ट्रीय टी-२० चषकासाठी खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात ७५% कपात करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. क्रिकेटपटूंना मागील आवृत्तीत पाकिस्तानी ४०,००० रुपये (अंदाजे १२,४५ रुपये) मिळाले होते. त्या ऐवजी आता १०,००० पाकिस्तानी रुपये (अंदाजे ३,११३ रुपये) दिले जातील. २०२२ मध्ये प्रत्येक खेळाडूला ६०,००० रुपये (सुमारे १८,६६८ रुपये) देण्यात आले होते. (Pakistan Cricket)

(हेही वाचा – Rohit Sharma Retirement Plan : रोहित शर्माच्या निवृत्तीचं ठरलं; ‘हा’ असणार शेवटचा सामना)

दुसरीकडे, राखीव क्रिकेटपटूंना प्रत्येक सामन्यासाठी ५,००० रुपये (सुमारे १,५५६ भारतीय रुपये) मिळतील. खेळाडूंच्या पगारात एवढी मोठी कपात का झाली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पीसीबीचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आश्वासन दिले होते की खेळाडूंना मिळणारा मोबदला कमी होणार नाही. क्रिकेटमधून मिळालेला पैसा क्रिकेटसाठीच वापरला जाईल, असंही ते म्हणाले होते. (Pakistan Cricket)

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने अलीकडेच चॅम्पियन्स करंडकाच्या आयोजनासाठी मोठा खर्च केला. तीन स्टेडिअमचं नुतनीकरण करण्यात आलं. शिवाय पाक संघासाठी जेसन गिलेस्पी आणि गॅरी कर्स्टन सारख्या परदेशी प्रशिक्षकांना मोठ्या कालावधीसाठी करारबद्ध करण्यात आलं होतं. परंतु काही दिवसांनी त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. शिवाय एका देशांतर्गत स्पर्धेत पाच दिग्गज क्रिकेटपटूंना मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि त्यांना दरमहा ५० लाख रुपये (सुमारे १५,५६,५०० रुपये) पगार देण्यात आला होता. तर टी-२० साठी असलेल्या नॅशनल लीगमध्येही यंदा मोठे बदल करण्यात आले. त्यावरही मंडळाचा पैसा खर्च झाला आहे. (Pakistan Cricket)

(हेही वाचा – SIP Stoppage : म्युच्युअल फंडातील एसआयपी थांबण्याचं प्रमाण फेब्रुवारीत १२२ टक्क्यांनी वाढलं)

आर्थिक संकटांमुळेच पाकिस्तान मंडळाने खेळाडूंचा मोबदला कमी केल्याचं बोललं जातंय. पण, ईएसपीएन क्रीकइन्फो या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, खेळाडू इतर देशांतर्गत स्पर्धांमधून चांगली कमाई करत असल्यामुळेच राष्ट्रीय टी-२० स्पर्धेत ७५ टक्के पगार कपात करण्यात आली आहे. पाक मंडळातील सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. (Pakistan Cricket)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.