Pak Sports War : पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचं भारतातील प्रक्षेपण बंद !

Pak Sports War : पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचं भारतातील प्रक्षेपण बंद !

46
Pak Sports War : पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचं भारतातील प्रक्षेपण बंद !
Pak Sports War : पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचं भारतातील प्रक्षेपण बंद !

ऋजुता लुकतुके

भारतातील क्रिकेट सामने (Pak Sports War) लाईव्ह प्रक्षेपित करणारं ॲप फॅनकोडने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचं भारतातील प्रसारण बंद केलं आहे. काश्मीरमध्ये पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कंपनीने ताबडतोब हा निर्णय घेतला आहे. आणि २४ एप्रिलपासून प्रसारण बंद केलं आहे. ‘पहलगाममध्ये घडलेल्या चित्त विचलित करणाऱ्या हल्ल्यानंतर देशवासीयांच्या भावनांची कदर करत आम्ही पीएसएलचं प्रसारण बंद करत आहोत,’ असं फॅनकोडने म्हटलं आहे. पीएसएल लीगच्या भारतातील प्रसारणाचे हक्क फॅनकोडकडे होते. (Pak Sports War)

हेही वाचा-Kunal Kamra ला दणका ! गुन्हा रद्द होणार , मुंबई उच्च न्यायालयाने ठणकावले

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने यावर अजून कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, सोशल मीडियावर या निर्णयाचे पुरेपूर पडसाद उमटले आहेत. यंदा पीएसएल आणि भारतातील आयपीएल या दोन्ही लीग एकाच वेळी सुरू आहेत. पण, क्रिकेट बाहेरच्या घटनांचे पडसाद भारत – पाक क्रिकेट प्रमाणेच या लीगवरही पडले आहेत. २००८ मध्ये आयपीएलची सुरुवात झाली तेव्हा पाक खेळाडू या लीगमध्ये खेळले. पण, त्याचवर्षी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. आणि बीसीसीआयने पाक खेळाडूंच्या आयपीएलमध्ये खेळण्यावर अनिश्चित काळासाठी बंदी आणली. तेव्हापासून पाक क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळलेले नाहीत. तर भारतीय खेळाडूही पीएसएल लीगच्या सुरुवातीपासून तिथे खेळलेले नाहीत. (Pak Sports War)

हेही वाचा-Pahalgam Terror Attack : पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांच्या घरात स्फोट ; काय आहे पहलगामशी संबंध ?

दोन्ही देशांमधील भूराजकीय तणावाचे पडसाद दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांवरही वेळोवेळी पडले आहेत. २००८ पासून भारतीय संघानेही पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. शिवाय दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिका बंद आहेत. आयसीसीच्या स्पर्धांत दोन्ही संघ तटस्थ ठिकाणी आमने सामने येतात. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ भारतात आला होता. पण, त्यानंतर २०२४ मध्ये झालेली आशिया चषक स्पर्धा आणि नुकतीच झालेली चॅम्पियन्स करंडक स्पर्धा यांच्यासाठी पाकिस्तानला खेळाडू पाठवायला बीसीसीआयने नकार दिला होता. त्यामुळे या दोन्ही स्पर्धांसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारावं लागलं. आणि भारताचे सामने अनुक्रमे श्रीलंका आणि युएईमध्ये झाले होते. (Pak Sports War)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.