P T Usha : पी टी उषाला ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये कोण त्रास देतंय?

87
P T Usha : पी टी उषाला ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये कोण त्रास देतंय?
P T Usha : पी टी उषाला ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये कोण त्रास देतंय?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारी सहाय्यक कॅप्टन अजय नारंग यांची कार्यकारिणीने अचानक हकालपट्टी केली आहे. आणि या निर्णयामुळे ऑलिम्पिक असोसिएशनची अध्यक्ष पी टी उषा (P T Usha) सध्या नाराज आहे. नारंग यांची हकालपट्टी ‘अन्यायकारक’ असल्याची प्रतिक्रियाही तिने दिली आहे. शिवाय तिला बाजूला सारून निर्णय घेतले जात असल्याची टीकाही सोमवारी पी टी उषाने (P T Usha) केली आहे.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात भारताची एकेकाळची अव्वल धावपटू असलेल्या पी टी उषाची (P T Usha) भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड बिनविरोध होती. आणि ९५ वर्षांत असोसिएशनला पहिल्यांदाच एक महिला अध्यक्ष म्हणून लाभली होती. ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीतील उपाध्यक्ष अजय पटेल आणि संयुक्त सचिव कल्याण चौबे हे उषाच्या विरोधात गेल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. उषा यांनीही या दोघांवर नाराजी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : हातात कॉंग्रेसची कमांड…पण काडीची नाही डिमांड!)

‘आपण एक संघ म्हणून काम करत नाही आहोत. आणि तुमच्या काही कृती या मला बाजूला सारून निर्णय घेतल्याचं सिद्ध करणाऱ्या आहेत. त्यामुळे मला खेदपूर्वक नमूद करावं लागतंय की, असोसिएशनवरील नियुक्तीचा अधिकार किंवा कामावरून हटवण्याचा अधिकार हा कार्यकारिणीला नाही. तो अध्यक्षांनाच आहे. या नियमाची मला आठवण करून द्यावी लागावी, हे दुर्दैवं आहे,’ या शब्दांत पी टी उषाने नाराजी व्यक्त केली आहे.

कार्यकारिणी सदस्यांनी बैठक न भरवताच अजय नारंग यांना हटवण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला, असा दावा उषा यांनी केला आहे. कार्यकारिणीच्या १५ पैकी १० सदस्यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये असोसिएशनचे सीईओ रघुराम अय्यर आणि अजय नारंग यांना पदांवरून हटवणारी नोटीस जारी केली. त्यावर ९ सदस्यांच्या सह्या आहेत. ही नोटीस कार्यालयात लावण्यातही आली. आणि अनधिकृत लोकांनी कार्यालयाच्या आवारात फिरू नये अशीही एक नोटीस त्यानंतर लावण्यात आली.

पी टी उषाने (P T Usha) अध्यक्ष म्हणून हे दोन्ही निर्णय रद्‌द केले आहेत. आणि कार्यकारिणीकडे ते अधिकारच नसल्याचा दावा केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.