-
ऋजुता लुकतुके
पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने सर्जिरल स्ट्राईक करून उत्तर दिल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. त्याचा परिणाम पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या पीसीएल क्रिकेट लीगवरही झाला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकमध्ये घुसून इस्लामाबाद, लाहोर आणि कराची इथं हल्ले केले. यात मुख्यत्वे रावळपिंडी आणि लाहोर इथं स्टेडिअमचंही नुकसान झालं आहे. त्यामुळे अखेर उर्वरित लीग संयुक्त अरब अमिरातीत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लीगचे एकूण ८ सामने अजून बाकी आहेत. ते कराची लाहोर आणि रावळपिंडी इथं होणार होते. ते आता युएईमध्ये होतील. (Operation Sindoor)
गुरुवारचा कराची किंग्ज विरुद्ध पेशावर झाल्मी हा सामना ऐनवेळी रद्द करावा लागला. कारण, रावळपिंडी इथं झालेल्या ड्रोन हल्ल्यात स्टेडिअमचं नुकसान झालं आहे. या स्टेडिअमवर होणारा पुढील सामनाही सध्या स्थगित करण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने स्पर्धा ठरल्याप्रमाणे होणार असं स्पष्ट केलं असलं तरी आयोजनाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. ‘मला खेदाने हे सांगावं लागत आहे की, पीसीएलचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीत होतीत. स्थानिक चाहत्यांना हे सामने आता आपल्या गावात पाहता येणार नाहीत, याचं दु:ख जरुर आहे. पण, आता या गोष्टीला पर्याय नाही. सामने हलवण्यात आले आहेत. नवीन वेळापत्रक आम्ही लवकरच जाहीर करू,’ असं पाक बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी स्पष्ट केलं आहे. (Operation Sindoor)
(हेही वाचा – Operation Sindoor : धरमशालातील सामना वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे रद्द; पुढील सामना अहमदाबादला हलवला)
THE PCB HAS SHIFTED THE REMAINING FIXTURES OF PSL 2025 TO THE UAE..!!!! (Gaurav Gupta/TOI). pic.twitter.com/pxO2roMdQN
— Tanuj (@ImTanujSingh) May 9, 2025
या बाबतीत पाक क्रिकेट बोर्डाचे अधिकारी फ्रँचाईजी मालक आणि खेळाडूंच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये इंग्लंडचे खेळाडू खेळत आहेत. जेम्स व्हिन्स, टॉम करन, सॅम बिलिंग, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड विली, ल्युक वूड आणि टॉम कोहलर हे इंग्लिश खेळाडू सध्या पाकिस्तानात आहेत. इथल्या परिस्थितीमुळे ते सध्या घाबरलेले आहेत. (Operation Sindoor)
द टेलिग्राफ या इंग्लिश वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लिश खेळाडू स्पर्धा सोडून मायदेशी परतण्याचा विचार करत आहेत. तसं झालं तरीही स्पर्धेचं भवितव्य अधांतरी होणार आहे. शिवाय रवी बोपारा आणि अलेक्झ्रांड्रा हार्टली हे खेळाडू प्रशिक्षक म्हणून संघांशी जोडले गेले आहेत. या सगळ्यांना आता मायदेशी परतण्याची इच्छा आहे. (Operation Sindoor)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community