NZ vs SA 1st Test : रचिन रवींद्रने सामनावीराचा पुरस्कार विल्यमसनबरोबर शेअर करायला का दिला नकार?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत रचिनने २४० धावांची खेळी केली होती. 

211
NZ vs SA 1st Test : रचिन रवींद्रने सामनावीराचा पुरस्कार विल्यमसनबरोबर शेअर करायला का दिला नकार?
  • ऋजुता लुकतुके

न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी २८१ धावांनी जिंकली. यात रचिन रवींद्र (rachin ravindra) आणि केन विल्यमसन यांनी आपल्या फलंदाजीने मोठी भूमिका बजावली. केन विल्यमसनने पहिल्या डावात ११८ तर दुसऱ्या डावात १०९ धावा केल्या. पहिल्या डावात डावखुरा सलामीवीर रचिन रवींद्रनेही २४० धावांची खेळी साकारली. कसोटीत सामनावीराचा पुरस्कार रचिनलाच मिळाला. (NZ vs SA 1st Test)

पुरस्कार वितरण सोहळ्यात रचिनला एक प्रश्न विचारण्यात आला की, हा सामनावीराचा पुरस्कार तो विल्यमसनबरोबर विभागून घेईल का? यावर रचिनने (rachin ravindra) दिलेल्या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला. तो म्हणाला, ‘नाही. मी हा पुरस्कार कुणालाही देणार नाही. विल्यमसनकडे ३० आहेत. माझा हा पहिला आहे.’ त्याचवेळी रचिनने कर्णधार केन विल्यमसनचं कौतुकही केलं. (NZ vs SA 1st Test)

(हेही वाचा – ICC Test Championship 2024-25 : भारत, ऑस्ट्रेलियाला मागे टाकून न्यूझीलंड आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल)

रचिनने १० सामन्यांत ५७८ धावा केल्या

विल्यमसनने या कसोटीत केलेल्या दोन शतकांनंतर सर्वाधिक कसोटी शतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही भारताच्या विराट कोहलीच्या पुढे गेला आहे. कोहलीच्या नावावर २९ कसोटी शतकं आहेत. विल्यमसनकडे आता ३१ कसोटी शतकं आहेत. (NZ vs SA 1st Test)

रचिनचं (rachin ravindra) मात्र ही पहिलंच आंतरराष्ट्रीय द्विशतक होतं. त्याने २६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३६६ चेंडूंमध्ये २४० धावा केल्या. ‘देशासाठी, राष्ट्रीय संघासाठी तुम्ही चांगली कामगिरी करू शकलात, तर त्याचं समाधान वेगळं असतं. सपोर्ट स्टाफचंही चांगलंच सहकार्य यासाठी मिळालं. माझ्या वैयक्तिक कामगिरीबरोबरच विल्यमसनबरोबर मी चांगली भागिदारी रचू शकलो, याचंही समाधान आहे,’ असं रचिन (rachin ravindra) सामन्यानंतर बोलताना म्हणाला. (NZ vs SA 1st Test)

२४ वर्षीय रचिन रवींद्र (rachin ravindra) भारतीय वंशाचा न्यूझीलंड खेळाडू आहे. आतापर्यंत न्यूझीलंडसाठी तो ४ कसोटी सामने खेळला आहे. आणि यात त्याने ३२५ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४६.३३ इतकी तगडी आहे. डावखुरा फलंदाज असलेला रचिन एकदिवशीय विश्वचषक स्पर्धेदरम्यान पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. १० सामन्यांत त्याने ५७८ धावा केल्या होत्या. (NZ vs SA 1st Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.