New Chess Star : भारतीय वंशाची बोधना शिवानंदन नवव्या वर्षी ग्रेट ब्रिटनसाठी खेळणार

New Chess Star : सप्टेंबरच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये बोधना ग्रेट ब्रिटनचं प्रतिनिधित्व करणार आहे. 

58
New Chess Star : भारतीय वंशाची बोधना शिवानंदन नवव्या वर्षी ग्रेट ब्रिटनसाठी खेळणार
  • ऋजुता लुकतुके

९ वर्षांच्या बोधना शिवानंदनने सगळ्यात लहान वयात बुद्धिबळ ऑलिम्पियाड खेळण्याचा विक्रम केला आहे. भारतीय वंशाच्या बोधनाची ग्रेट ब्रिटनच्या संघात निवड झाली आहे. अख्ख्या ऑलिम्पियाड स्पर्धेतील ती सगळ्यात लहान बुद्धिबळपटू असणार आहे. तिच्या खालोखाल वयाने सगळ्यात लहान खेळाडू आहे तो चीनचा २३ वर्षीय लॅन याओ. बाकी सर्व खेळाडू हे ३० ते ४० वर्षं वयोगटातील आहेत. (New Chess Star)

फिडेच्या जुलै महिन्यात जाहीर झालेल्या क्रमवारीनुसार, बोधाना १० वर्षांखालील मुलांच्या गटात जागतिक स्तरावर अव्वल आहे. तर ब्लिट्झ प्रकारात पहिल्या १०० लहान मुलांमध्ये आहे. २००३ नंतर जन्म झालेल्या मुलांमध्ये तिचा क्रमांक ५८ वा आहे. तिचं एलो रेटिंग २,१८५ इतकं आहे. (New Chess Star)

(हेही वाचा – Pune Porsche Accident : अखेर ‘त्या’ बाळाने लिहिला 300 शब्दांचा निबंध)

बोधनाला तिचा पहिला पट असा मिळाला

इंग्लिश संघातील बोधनाची ज्येष्ठ सहकारी योवांका होस्का तिच्याबद्दल बोलताना अलीकडेच म्हणाली होती की, ‘इतक्या लहान वयात २१०० पेक्षा जास्त रेटिंग असणं ही गोष्ट प्रतिस्पर्ध्याला घाबरवणारीच आहे. तिच्याशी खेळलेल्या काही खेळाडूंशी मी बोललेय. तिला प्रतिस्पर्धी घाबरतात.’ गेल्यावर्षी इंग्लिश बुद्धिबळ वर्तुळात बोधनाची पहिल्यांदा चर्चा सुरू झाली. ८ वर्षांखालील गटात तिने क्लासिक, रॅपिड आणि ब्लिट्झ अशा तीनही प्रकारात विजेतेपद पटकावलं. (New Chess Star)

आणि त्यानंतर कामगिरीतल्या सातत्याने तिने इंग्लिश संघात स्थान मिळवलंय. जेमतेम कोरोना लॉकडाऊनमध्ये बोधना बुद्धिबळ खेळायला लागली आणि तीनच वर्षांत तिने ही प्रगती केली आहे. लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा ती ५ वर्षांची होती. तिचे वडील वेलायुथम हे चेन्नईचे आहेत आणि त्यांनाही बुद्धिबळ आवडतं. पण, बोधनाला तिचा पहिला पट वेलायुथम यांच्या मित्राकडून मिळाला. मित्र आपलं गॅरेजमधील सामान काढून टाकत असताना त्यांना बुद्धिबळाचा पट मिळाला. त्यांना तो देऊन टाकायचा होता. वेलायुथम यांनी तो घरी आणला. बोधानाला राजा, राणीच्या गोष्टी आवडतात. बुद्धिबळात राजा, राणी व प्यादं अशी सेना बघून ती खुश झाली. आई-वडिलांनी तिला प्राथमिक धडे दिले आणि बाकी ती चक्क युट्यूब व्हिडिओ बघून शिकली. (New Chess Star)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.