Neeraj Chopra : नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत कोण कोण खेळणार?

येत्या २४ मे ला बंगळुरूत ही स्पर्धा होणार आहे.

27
Neeraj Chopra : नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत कोण कोण खेळणार?
Neeraj Chopra : नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत कोण कोण खेळणार?
  • ऋजुता लुकतुके

भालाफेकीत भारताचे उगवते खेळाडू सचिन यादव, रोहित यादव आणि साहील सिलवाल हे खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) क्लासिक स्पर्धेत खेळणार आहेत. जेएसडब्ल्यू स्टील (JSW Steel) आणि नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. नीरज चोप्रा क्लासिक असं नाव तिला देण्यात आलं आहे. २४ मे ला बंगलुरूत होणाऱ्या स्पर्धेत जागतिक स्तरावरील नावाजलेले भालाफेकपटूही सहभागी होणार आहेत. जागतिक ॲथलेटिक्स फेडरेशनने स्पर्धेला ए रेटिंग दिलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ७ आणि ४ भारतीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

‘भारतीय मातीत तयार झालेल्या भालाफेकपटूंची नाव जाहीर करत आहोत. नीरजचोप्रा (Neeraj Chopra) क्लासिक स्पर्धेत ४ भारतीय एकमेकांशी झुंजणार आहेत,’ असं स्पर्धेच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर म्हटलं आहे. या चौघांचे फोटोही देण्यात आले आहेत. नीरजचा अपवाद वगळता सचिन यादवनेही (Sachin Yadav) यापूर्वी ८४.३९ मीटरची भालाफेक केलेली आहे. कोचीमध्ये झालेली फेडरेशन चषक स्पर्धा आणि राष्ट्रीय स्पर्धा यात त्याने सुवर्ण जिंकलं आहे.

(हेही वाचा – IPL 2025, Vaibhav Suryavanshi : धोनी, विराटकडून वैभवला काय मंत्र मिळाला?)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack: पाकिस्तानची उलटी गिनती सुरू; ‘हे’ केंद्रीय मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला)

तर रोहित यादवची (Rohit Yadav) वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे ती ८३.४० मीटरची. २०२३ मध्ये ही कामगिरी केल्यानंतर दुखापतींनी त्याला सतावलं आहे. त्यामुळे त्याची कामगिरी त्यानंतर काहीशी खालावली आहे. २४ वर्षीय साहील हा ८० मीटरच्या पार जाण्याची क्षमता असलेला आणखी एक भालाफेकपटू आहे. फेडरेशन चषकात त्याला कांस्य मिळालं होतं. खुद्द नीरजला आंतरराष्ट्रीय स्तरावर ९० मीटरचा पल्ला अजून गाठायचा आहे. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे ती ८९.९४ मीटरची.

नीरज चोप्रा (Neeraj Chopra) क्लासिक स्पर्धेत अँडरसन पीटर्स, थॉमस रोहलर, ज्युलिअस येगो, कर्टिस थॉमसन, रुमेश पथिरागे आणि लुईस मारिसिओ हे आंतरराष्ट्रीय भालाफेकपटू सहभागी होणार आहेत. यातील पहिल्या तीन खेळाडूंनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ९२ मीटरच्यावर भालाफेक केलेली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.