Neeraj Chopra : नीरज चोप्रा पॅरिस डायमंड्स लीगमध्ये खेळणार; ८ वर्षांनंतर स्पर्धेत पुनरागमन

Neeraj Chopra : येत्या २० जूनला ही स्पर्धा होणार आहे.

42
Neeraj Chopra : नीरज चोप्रा पॅरिस डायमंड्स लीगमध्ये खेळणार; ८ वर्षांनंतर स्पर्धेत पुनरागमन
  • ऋजुता लुकतुके

भालाफेकीतील सध्याचा विश्वविजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) येत्या २० जूनला होणाऱ्या पॅरिस डायमंड्स लीगमध्ये सहभागी होणार आहे. ऑलिम्पिक्स डॉट कॉम या वेबसाईटवर ही बातमी देण्यात आली आहे. नीरज ८ वर्षांनंतर या स्पर्धेत सहभाही होणार आहे. तर दोहा नंतर या डायमंड्स लीगमधील त्याची हंगामातील ही दुसरी स्पर्धा असेल. दोहामध्ये नीरजने ९० मीटर भालाफेकीचं लक्ष्य तर पूर्ण केलं. पण, तो जर्मनीच्या ज्युलियन वेबरच्या मागोमाग दुसरा आला होता.

पॅरिस डायमंड्स लीगमध्ये नीरज (Neeraj Chopra) २०१७ नंतर पहिल्यांदाच खेळणार आहे. तेव्हा ८४.६७ मीटरच्या फेकीसह तो पाचवा आला होता. जर्मनीच्या जोहानस व्हेटरने ८८.७४ मीटरच्या फेकीसह सुवर्ण जिंकलं होतं. त्यानंतर २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी नीरजने पॅरिस डायमंड्स लीग न खेळण्याचं ठरवलं होतं. यंदा एकाच महिन्यापूर्वी नीरजने दोहा इथं खेळताना ९०.२३ मीटरची भालाफेक केली आहे. ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.

(हेही वाचा – Elon Musk यांचं एक ट्विट अन् राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबतचा वाद विकोपाला; राजकीय पक्षाचे संकेत?)

ही कामगिरीही त्याला सुवर्ण मिळवून देऊ शकली नाही. जर्मनीच्या वेबरने ९१.०६ मीटरच्या फेकीसह सुवर्ण जिंकलं. तर पॅरिस ऑलिम्पिकमध्येही नीरजने (Neeraj Chopra) रौप्य जिंकलं होतं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने या ऑलिम्पिकमध्ये भालाफेरीत सुवर्ण जिंकलं. पॅरिस ऑलिम्पिकनंतर नीरजने आपल्या दुखापतग्रस्त हातावर उपचार करून घेण्यासाठी काही काळ भालाफेकीतून विश्रांती घेतली होती. या हंगामात तो एकूण चार स्पर्धा खेळला आहे. पॉश इन्व्हिटेशन मीट इथं पावसामुळे ओल्या झालेल्या ट्रॅकवर त्याने ८४.५२ मीटरवर भाला फेकला. तर अलीकडे २३ मे ला पोलंडमध्ये झालेल्या स्पर्धेतही तो ८४ मीटरचाच पल्ला गाठू शकला.

२० जूनच्या पॅरिस डायमंड्स लीगनंतर तो २४ जूनला झेकिया इथं खेळणार आहे. लगेचच जुलै महिन्यात नीरजनेच पुढाकार घेऊन भारतात बंगळुरू इथं नीरज चोप्रा (Neeraj Chopra) क्लासिक स्पर्धा आयोजित केली आहे. डायमंड्स लीग ही ॲथलेटिक्समधील सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. लीग स्वरुपात होणाऱ्या स्पर्धेचे विविध टप्पे वेगवेगळ्या देशांत भरवले जातात. विजेतेपदाबरोबरच प्रत्येक स्पर्घेत खेळाडूंना कामगिरीप्रमाणे गुण मिळतात. सर्वोत्तम ८ खेळाडू डायमंड्स लीगच्या समारोपाच्या म्हणजे अंतिम फेरीत खेळू शकात. यंदा ऑगस्ट महिन्यात डायमंड्स लीगची अंतिम फेरी जर्मनीत झ्युरिच इथं होणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.