-
ऋजुता लुकतुके
अलीकडेच दोहा इथं झालेल्या डायमंड्स लीगमध्ये भालाफेकीत आपली सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदवत ९० मीटरची भालाफेक साध्य करणाऱ्या नीरज चोप्राचं (Neeraj Chopra) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं होतं. नीरजने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ९०.२३ मीटरची फेक करत रौप्य जिंकलं होतं. जर्मनीच्या ज्युलिअन वेबरने ९१.०६ मीटरच्या भालाफेकीसह सुवर्ण जिंकलं. पण, नीरज गेली दोन वर्षं जे साध्य करू पाहत होता ते शक्य झाल्यामुळे नीरजचंही भारतात कौतुक झालं.
डायमंड्स लीगमध्ये नीरजने (Neeraj Chopra) आपलं चौथं पदक जिंकलं आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून नीरजचं जाहीर कौतुक केलं. ‘नीरजचं आणखी एक देखणं यश. त्याला ९० मीटरच्या वर भालाफेक साध्य केल्याबद्दल शुभेच्छा. त्याची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. शिस्त, खेळावरील प्रेम आणि समर्पण यातून हे यश त्याने साध्य केलं आहे,’ असं पंतप्रधान मोदी आपल्या संदेशात म्हणाले होते. स्पर्धा पार पडल्यानंतर आता नीरजनेही पंतप्रधानांच्या संदेशाला उत्तर दिलं आहे.
(हेही वाचा – India’s Tour of England : इंग्लंड दौऱ्यापूर्वी सर्फराझ खानने केलं १० किलो वजन कमी)
Thank you shri @narendramodi ji for your kind words and encouragement. I hope to continue and give my best for the country always! 🇮🇳 https://t.co/kr7Lgk8ZUe
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) May 18, 2025
‘नरेंद्र मोदीजींच्या कनवाळू आणि प्रेरणादायी शब्दांसाठी त्यांचे खूप आभार. मी देशासाठी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न कायम करत राहीन,’ असं नीरज चोप्राने (Neeraj Chopra) आता म्हटलं आहे. सलग तिसरं रौप्य जिंकलं असलं तीर नीरजसाठी आताही स्पर्धेचा अनुभव संमिश्र ठरला. या आधीच्या डायमंड्स लीगमध्ये स्टॉकहोम आणि तुर्कू इथंही नीरजने आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. पण, त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावं लागलं. यावेळीही ९०.२३ मीटरची भालाफेक केल्यानंतर त्याचा क्रमांक दुसराच राहिला.
जांघेच्या दुखापतीमुळे आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यात अडचणी येत होत्या. पण, आता तंदुरुस्ती सुधारली असून इथून पुढे अधिकाधिक चांगली कामगिरी करण्यावर भर देऊ असं नीरजने (Neeraj Chopra) स्पर्धेनंतर म्हटलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community