Nadal To Make a Comeback : राफेल नदाल बार्सिलोना ओपन खेळणार

Nadal To Make a Comeback : यंदा जानेवारी महिन्यात पुनरागमनाचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर नदाल आता पुन्हा कोर्टवर परतणार आहे. 

100
Nadal To Make a Comeback : राफेल नदाल बार्सिलोना ओपन खेळणार
  • ऋजुता लुकतुके

या आठवड्यात सुरू होणाऱ्या बार्सिलोना ओपन स्पर्धेत राफेल नदाल (Rafael Nadal) आपलं नशीब आजमावणार आहे. या वर्षातील त्याचं हे दुसरं पुनरागमन असेल. यापूर्वी जानेवारीत तो ब्रिस्बेन ओपन स्पर्धेत खेळला होता. पण, पायाच्या दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलियन ओपन आणि नंतर आणखी काही स्पर्धा त्याला खेळता आल्या नाहीत. सोमवारी पत्रकार परिषदेत नदालने खेळण्याचा निर्णय जाहीर केला. (Nadal To Make a Comeback)

‘मी बार्सिलोनात पोहोचलो तरीही नक्की खेळता येईल की नाही, हे कळत नव्हतं. अखेर शेवटच्या क्षणी मी स्पर्धेत सामील होण्याचा निर्णय घेतला. उद्या मी कोर्टवर असेन,’ असं नदालने (Rafael Nadal) पत्रकारांना सांगितलं. ३७ वर्षीय नदालने २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत. गेल्या आठवड्यात माँटे कार्लो इथं तो खेळणार होता. पण, ऐनवेळी शरीर अजून साथ देत नसल्याचं सांगत त्याने माघार घेतली होती. (Nadal To Make a Comeback)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : संवेदनशील भागातील मतदान पथके रवाना)

नदालचा पहिला सामना होणार याच्याशी 

माजी नंबर वन खेळाडूने २०२४ च्या शेवटी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा विचार बोलून दाखवला आहे. पण, जानेवारीपासून तो फारसं टेनिस खेळूच शकलेला नाही. खरंतर क्ले कोर्ट ही नदालची (Rafael Nadal) मक्तेदारी. पण, क्ले हंगाम सुरू होऊनही तो अजून पुरेसा तंदुरुस्त झालेला नाही. आणि अजूनही फ्रेंच ओपन तो खेळू शकेल का, यावर प्रश्नचिन्ह आहे. बार्सिलोना इथं त्याच्या तंदुरुस्तीची खरी परीक्षा होईल. फ्रेंच ओपन ही ग्रँडस्लॅम नदालने विक्रमी १४ वेळा जिंकली आहे. (Nadal To Make a Comeback)

बार्सिलोना ही घरच्या मैदानावरील स्पर्धाही त्याने १२ वेळा जिंकली आहे. पण, २०२१ पासून तो इथं खेळलेला नाही. यंदा एका वर्षाच्या विश्रांतीनंतर जानेवारी महिन्यात नदाल (Rafael Nadal) ब्रिस्बेन ओपन खेळला. पण, तिथं तिसऱ्या फेरीतच त्याच्या पायाचा स्नायू दुखावला. त्यानंतर आता तो पुन्हा पुनरागम करणार आहे. बार्सिलोना ओपनमध्ये नदालचा पहिला सामना इटलीच्या फ्लाबिओ कोबोलीशी होणार आहे. (Nadal To Make a Comeback)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.