MLC 2025 : मेजर लीगमध्ये पुनरागमन करत पोलार्डने विराट कोहलीला टाकले मागे; केला ‘हा’ रेकॉर्ड

44
MLC 2025 : मेजर लीगमध्ये पुनरागमन करत पोलार्डने विराट कोहलीला टाकले मागे; केला 'हा' रेकॉर्ड
MLC 2025 : मेजर लीगमध्ये पुनरागमन करत पोलार्डने विराट कोहलीला टाकले मागे; केला 'हा' रेकॉर्ड

मेजर लीग क्रिकेट म्हणजेच एमएलसीमध्ये टेक्सास सुपर किंग्ज (Texas Super Kings) विरुद्ध एमआय न्यूयॉर्कसाठी (MI New York) ३२ धावांची खेळी केल्यानंतर कायरन पोलार्डने (Kieron Pollard) टी-२० धावांच्या यादीत विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकले. जवळजवळ पाच महिन्यानंतर पोलार्डने हा सामना खेळला आहे. लीग क्रिकेटमध्ये टेक्सास सुपर किंग्ज विरुद्ध एमआय न्यूयॉर्कसाठी खेळणाऱ्या पोलार्डने फक्त १६ चेंडूत ३२ धावा केल्या आणि तो धावबाद झाला. (MLC 2025)

(हेही वाचा – Environment Day : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील ‘मुंबई फळोत्सव २०२५’ला उत्स्फूर्त प्रतिसाद)

आयपीएलच्या (IPL) अंतिम सामन्यात पोलार्डला मागे टाकणाऱ्या कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये १३,५४३ धावा केल्या आहेत. आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आता त्याच्यापेक्षा २६ धावांनी पुढे आहे. कायरन पोलार्डने (Kieron Pollard) आतापर्यंत १३,५६९ धावा केल्या आहेत. पोलार्ड सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो. कारण तो शोएब मलिकला (Shoaib Malik) मागे टाकण्यापासून फक्त तीन धावा दूर आहे. आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी कोहली वर्षभर टी-२० क्रिकेट खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामळे पोलार्डला कोहली आणि मलिकच्या पुढे मोठी आघाडी घेण्याची नामी संधी आहे. (MLC 2025)

मागील तीन हंगामांपासून मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) फलंदाजी प्रशिक्षक असलेला पोलार्ड त्याच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे आपल्या कारकीर्दीत कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आपल्या नावावर आणखी एक विक्रम करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.