Koneru Humpy : कोनेरू हम्पीला फिडे महिला बुद्धिबळ ग्रँड प्रिक्स विजेतेपद

Koneru Humpy : हम्पीने टाय-ब्रेकरवर चीनच्या त्सू जीनरचा पराभव केला.

34
Koneru Humpy : कोनेरू हम्पीला फिडे महिला बुद्धिबळ ग्रँड प्रिक्स विजेतेपद
  • ऋजुता लुकतुके

भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने (Koneru Humpy) फिडे महिला बुद्धिबळ ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद पटकावताना वेगवान खेळाचं प्रात्यक्षिक घडवलं आहे. साखळी सामन्यानंतर हम्पी आणि चीनची त्सू जिनर यांचे प्रत्येकी ७ गुण झाले होते. त्यामुळे विजेती ठरवण्यासाठी टायब्रेरकचा अवलंब करण्यात आला आणि इथे वेगवान चाली रचताना हम्पी चिनी प्रतिस्पर्ध्यापेक्षा सरस ठरली. साखळी सामन्यांत शेवटच्या दिवशीही हम्पी आणि जिनर बरोबरीत होत्या. हम्पीने बल्गेरियाच्या सालिमोवाचा पराभव करत ७ गुण मिळवले. तर जिनरनेही तिची प्रतिस्पर्धी पोलिनो शुवालोवाचा पराभव केला. त्यामुळे दोघींचे समसमान ७ गुण झाले आणि पुढे टायब्रेकरचा अवलंब विजेती ठरवण्यासाठी करावा लागला.

टायब्रेकरमध्ये मात्र हम्पीने (Koneru Humpy) जिनरला संधी दिली नाही. अनुभवाच्या जोरावर झटपट चाली रचत हम्पीने कायम जिनरवर दडपण वाढतं ठेवलं. अखेर तिसऱ्याच डावांत निकाल स्पष्ट झाला.

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : पहलगाममधील हल्ल्यानंतर श्रीनगरसाठीचे विमान तिकीट दर वाढवणाऱ्या विमान कंपन्यांना सरकारची चपराक)

पाचव्या फेरीअखेर खरंतर कोनेरू हम्पी (Koneru Humpy) एकटीच ५.५ गुणांसह आघाडीवर होती. पण, पुढील सामन्यांत एलिना काश्लिन्सकायाने तिला बरोबरीच रोखलं. उलट जिनरने भारताच्या दिव्या देशमुखचा पराभव करून अख्खा एक गुण कमावला. त्यामुळे दोघींची ६ – ६ अशी बरोबरी झाली आणि निकाल शेवटच्या साखळी सामन्यानंतर अधांतरी राहिला. इथेही दोघींनी आपापले सामने जिंकल्यामुळे ७-७ अशी बरोबरी झाली आणि टायब्रेकरचा अवलंब करावा लागला. ते दोनही सामने हम्पीने जिंकले.

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : हल्ल्याच्या ठिकाणी एकही सैनिक का नव्हता; सामाजिक माध्यमांवर होत आहे चर्चा)

भारताची दिव्या देशमुख ५.५ गुणांसह तिसरी आली. तर तिच्या खालोखाल ४.५ गुणांसह हरिका द्रोणवल्ली चौथी आली. वैशाली रमेशबाबूला ४ गुणांसह सहाव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. स्पर्धेचा हा पुणे टप्पा होता. आता पुढील टप्पा ५ मे पासून ऑस्ट्रियात होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.