Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराने कप्तानीवरून घेतला हा महत्त्वाचा निर्णय

Jasprit Bumrah : यापूर्वी संघाचं नेतृत्व करायला आवडेल असं भाष्य बुमराने केलं होतं 

81

ऋजुता लुकतुके

रोहीत शर्माच्या (Rohit Sharma) कसोटीतून निवृत्ती घेण्याच्या निर्णयामुळे भारतीय संघात कर्णधाराची जागा रिकामी झाली आहे. आणि जून महिन्यातील इंग्लंडच्या दौऱ्यासाठी संघ निवडताना नवीन कर्णधाराची घोषणा होईल. सध्या शुभमन गिल (Shubman Gill) याचं नाव आघाडीवर आहे. तर त्या खालोखाल रिषभ पंतचं (Rishabh Pant) नाव घेतलं जात आहे. खरंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर जसप्रीत बुमराकडेच (Jasprit Bumrah) भावी कर्णधार म्हणून पाहिलं जात होतं. आणि त्या दौऱ्यातही दोन कसोटींत बुमरानेच भारताचं नेतृत्व केलं होतं. पण, आता पूर्णवेळचा कप्तान निवडण्याची वेळ आली असताना बुमरा स्वत: या शर्यतीतून बाहेर झाला आहे.

स्काय स्पोर्ट्सने दिलेल्या बातमीनुसार, बुमराने तसं संघ प्रशासनाला कळवलं आहे. पाठदुखीमुळे बुमरा या दौऱ्यात पाचही कसोटी खेळण्याची शक्यता कमीच आहे. तो फक्त ३ ते ४ कसोटीच खेळू शकेल. त्यामुळे बुमरा कप्तानीच्या शर्यतीतून मागे पडला आहे. बुमराच्या अनुपलब्धतेमुळे आता गिल आणि रिषभ पंत यांचीच नावं आघाडीवर आहेत. आणि दोघांमध्ये एक कर्णधार तर दुसरा उपकर्णधार होईल हे जवळ जवळ निश्चित आहे. निवड समितीची बैठक २४ मे रोजी होईल अशी शक्यता आहे.

स्काय स्पोर्ट्सच्या बातमीत विराट कोहलीच्या संभाव्य निवृत्तीचाही उल्लेख आहे. विराटने एप्रिल महिन्यातच निवृत्तीचा निर्णय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरला कळवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आणि आगरकर तसंच बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी विराट कोहलीची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Virat Kohli Test Retirement) पण, सीमेवरील तणावामुळे सध्या ती भेट झालेली नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल अजून बीसीसीआयने कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. (Jasprit Bumrah)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.