ISSF Shooting Gold : सुरुची सिंगला सुवर्ण; मनू भाकर पात्रता फेरीतच बाद

ISSF Shooting Gold : या स्पर्धेत सुरुचीचं हे तिसरं सुवर्ण आहे. 

35
ISSF Shooting Gold : सुरुची सिंगला सुवर्ण; मनू भाकर पात्रता फेरीतच बाद
  • ऋजुता लुकतुके

यंदा विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत १९ वर्षीय युवा सुरुची सिंगने कमाल करून दाखवली आहे. म्युनिचमध्ये झालेल्या या स्पर्धेत सुरुचीने सलग तिसरं सुवर्ण जिंकलं. १० मीटर एअर रायफल हा खरंतर मनू भाकरचा लाडका प्रकार. पण, नेमकी मनू यंदा अपयशी ठरली. पण, ही कसर भारतासाठी सुरुचीने भरून काढली. २४१.९ गुणांचा वेध घेत तिने सुवर्णाला गवसणी घातली आणि महत्त्वाचं म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती कॅमेलीला तिने मागे टाकलं. दोघांमध्ये फक्त ०.२ गुणांचा फरक होता. तर चीनच्या याओ क्वीनहुआनला कांस्य मिळालं. तिने २२१.७ गुण मिळवले. (ISSF Shooting Gold)

(हेही वाचा – ड्रग्ज तस्कर ताहिर डोला CBI च्या ताब्यात; यूएईतून केले होते हद्दपार)

सुरुची सध्याची राष्ट्रीय विजेती आहे आणि यंदा विश्वचषक स्पर्धेच्या ब्युनॉस आयर्स आणि लिमा मधील टप्प्यातही तिनेच सुवर्ण जिंकलं होतं. खरंतर यंदा या मानाच्या स्पर्धेत तिने पदार्पण केलं आहे आणि राष्ट्रीय स्पर्धेनंतर लगेचच ती ब्युनॉस आयर्सला या स्पर्धेत खेळली होती. पण, तिने जिगर दाखवत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यावेळी पात्रता फेरीत सुरुचीने ५८८ गुण कमावले. हा भारतासाठी राष्ट्रीय विक्रम आहे. आता तिने मनू भाकरशी बरोबरी केली आहे. पात्रता फेरीत ५८८ गुणांसह ती दुसरी होती. चीनची याओ इथं पहिली आली होती. (ISSF Shooting Gold)

(हेही वाचा – Forest Department : घोरपड, ससे, रानडुकरांची शिकार कराल तर… वनविभाग अलर्ट मोडवर !)

पण, ८ जणांच्या अंतिम फेरीत सुरुचीने याओला २० गुणांनी मागे टाकलं. ऑलिम्पिक कांस्य विजेती मनू भाकर ५७४ गुणांसह २१ वी आली. तर भारताची आणखी एक खेळाडू पलक ५७० गुणांसह ३० वी आली. अंतिम फेरीत दुसऱ्या क्रमांकाच्या कॅमिलीने सुरुचीला तगडी लढत दिली आणि सुरुवातीला खरंतर सुरुची तिच्यापेक्षा मागे होती. पण, पहिली फेरी झाल्यानंतर सुरुचीने स्वत:ला सावरलं आणि एक राऊंड १०.७ फेरीची दिली. तिथे कॅमिलीने ९.४ गुण मिळवल्यामुळे पहिल्यांदा सुरुचीला आघाडी मिळाली. ती तिने अखेरपर्यंत टिकवली. मनू भाकरने युवा भारतीय खेळाडूला सुवर्ण मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. यंदाच्या विश्वचषकात भारताने मिळवलेलं हे पहिलं सुवर्ण आहे. यापूर्वी अंजूम मुदगिल आणि सिफ्त कौर सामरा यांनी कांस्य पदकाची कमाई केली आहे. (ISSF Shooting Gold)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.