IPL vs PSL : पीएसएलची पुन्हा नाचक्की; कुशल मेंडिस पीएसएल सोडून आयपीएलकडे

IPL vs PSL : कुशल मेंडिसच नाही तर अनेक परदेशी खेळाडू पीएसएलमध्ये परतले नाहीत.

44
IPL vs PSL : पीएसएलची पुन्हा नाचक्की; कुशल मेंडिस पीएसएल सोडून आयपीएलकडे
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तान सुपर लीग आयोजित करताना पाकिस्तानची पुन्हा एकदा फजिती झाली आहे. आयपीएलप्रमाणेच पीएसएल तणावानंतर पुन्हा सुरू होणार आहे. पण, एकतर परदेशी खेळाडू पाकिस्तानला परतण्यासाठी उत्सुक नाहीत. कुशल मेंडिसने तर पीएसएल सोडून भारतीय लीगमधील फ्रँचाईजीशी करार करणं पसंत केलं आहे. त्यामुळे पाकची आणखी नाचक्की झाली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे दोन्ही स्पर्धा काही काळासाठी रद्द करण्यात आल्या होत्या. पीएसएल रद्द केल्यानंतर पाकिस्तानने ते यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या मुस्लिम देशाच्या सरकारने पाकिस्तानला त्यांच्या देशात स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी देण्यास नकार दिला. (IPL vs PSL)

(हेही वाचा – ५०वा Sikkim राज्य स्थापना दिवस, चोग्याल राजघराण्यासोबत Sikkim चा इतिहास जाणून घ्या)

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता निवळल्यावर दोन्ही क्रिकेट बोर्डांना लीग पुन्हा सुरू करायच्या आहे. पण, पाकिस्तानच्या अडचणी थांबताना दिसत नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खेळाडूंना विनंती करत आहे, पण काही खेळाडूंनी पाकिस्तानात परत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पीएसएल संघ मुलतान सुल्तान्स वगळता सर्व संघ फ्रँचायझींना मोठा धक्का बसला आहे. १७ मे २०२५ पासून पीएसएल पुन्हा सुरू होणार आहे. कराची, लाहोर, इस्लामाबाद, क्वेटा आणि पेशावर येथील संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. जर या संघांना परदेशी खेळाडू मिळाले नाहीत, तर स्पर्धेत एक मिनी ड्राफ्ट होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये पाकिस्तानमधील उर्वरित खेळाडूंना पीएसएलमध्ये खेळवता येईल. दरम्यान, कराची किंग्जचा कर्णधार आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानात परतण्यास सज्ज आहे. (IPL vs PSL)

(हेही वाचा – महाराष्ट्राच्या Chief Secretary Post साठी ‘शर्यत रंगली’; भूषण गगराणी आघाडीवर, चहल-राजेश यांच्यात जोरदार स्पर्धा)

पाकिस्तानमधील रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला झाला, त्यानंतर पाकिस्तान सुपर लीग रद्द करण्यात आली. यानंतर, पीएसएल खेळण्यासाठी आलेले अनेक परदेशी खेळाडू त्यांच्या देशात परतले, आता पाकिस्तानमधील परिस्थिती पाहून ते परत येण्यास नकार देत आहेत. पीएसएल पॉइंट्स टेबलमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्स अव्वल स्थानावर आहे. ग्लॅडिएटर्सने ९ पैकी ६ सामने जिंकले आहेत, २ सामने गमावले आहेत तर एक अनिर्णीत राहिला आहे. क्वेटा ग्लॅडिएटर्सने प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. कराची किंग्ज १० गुणांसह पॉइंट टेबलवर दुसऱ्या स्थानावर आहे, त्यांनी ८ पैकी ५ सामने जिंकले आहेत. (IPL vs PSL)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.