IPL Suspended : आयपीएल स्थगित होईपर्यंत मध्ये काय काय घडलं; जाणून घेऊया घटनाक्रम

IPL Suspended : बीसीसीआयने सध्या ८ दिवसांसाठी स्पर्धा स्थगित केली आहे.

72
IPL Suspended : आयपीएल स्थगित होईपर्यंत मध्ये काय काय घडलं; जाणून घेऊया घटनाक्रम
  • ऋजुता लुकतुके

रंगात आलेल्या आयपीएल स्पर्धेला अचानक आणि अनपेक्षित खिळ बसली आहे. शुक्रवार ९ मे पासून आयपीएल सध्या ७ दिवसांसाठी स्थगित झाली आहे. भारतातील पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. अशावेळी राष्ट्रीय सुरक्षा आणि खेळाडूंच्या सुरक्षेला महत्त्व देत बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा तात्पुरती स्थगित केली आहे.

या निर्णयाप्रत बीसीसीआय येईपर्यंत मध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. पंजाब विरुद्ध दिल्ली सामना रद्द करावा लागणं, पाकिस्तानने उत्तर भारतात केलेले क्षेपणास्त्र हल्ले, राजधानी दिल्लीसह काही भागात जाहीर झालेला ब्लॅकआऊट अशा घटनांनंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला. त्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर नेमकं काय काय घडलं हा घटनाक्रम एकदा पाहूया, (IPL Suspended)

(हेही वाचा – India Pakistan War : राजस्थानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला ; भारतीय हवाई दलाने पाकचे मनसुबे उधळले)

७ मे २०२५
  • भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. या अंतर्गत सुरुवातीला पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर भारताने हल्ला केला.
  • पाकिस्तानच्या प्रत्युत्तराची शक्यता लक्षात घेऊन उत्तर भारतातील सीमेलगतची १० नागरी विमानतळं भारताने १० तारखेपर्यंत बंद केली.
  • विमानतळं बंद झाल्यामुळे मुंबईचा संघ रविवारच्या सामन्यासाठी धरमशाला इथं पोहोचणं कठीण झालं. हा सामना दुसरीकडे हलवावा लागला.
  • अनिश्चिततेच्या वातावरणातच कोलकाता वि चेन्नई सामना कोलकात्यात झाला. या सामन्यात प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे ‘माँ तुझे सलाम’ गाण्याचा गरज करत तीनही सैन्यदलांना मानवंदना दिली.

(हेही वाचा – Fact Check : अफवांचा बाजार उठवणाऱ्या पाकिस्तानचा भारतीय सैन्याकडून पुराव्यांसह पर्दाफाश !)

८ मे २०२५
  • पंजाब वि मुंबई सामना अधिकृतपणे अहमदाबादला हलवण्यात आला.
  • संध्याकाळी पंजाब विरुद्ध दिल्ली सामना १०.१ षटकांनंतर बंद करण्यात आला. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाल यांनी मैदानावर उतरून स्टेडिअम खाली करण्याची घोषणा केली. वीज पुरवठा खंडित होण्याचं कारण होतंच. शिवाय प्रशासनाला सुरक्षेची काळजीही वाटत होती.
  • इतक्यात पाकिस्तानने भारतातील ८ शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यातील प्रत्येक हल्ला हाणून पाडण्यात आला. पण, परिस्थिती चिघळण्याची भीती निर्माण झाली. आयपीएल प्रशासनाला रात्रीतच महत्त्वाची बैठक घेऊन आढावा घ्यावा लागला. (IPL Suspended)

(हेही वाचा – IPL Suspended : भारत – पाक तणावामुळे आयपीएल स्थगित झाल्यावर खेळाडू आपापल्या गावी पांगले)

९ मे २०२५
  • शुक्रवारी दुपारीच १६ सामने अजून बाकी असताना आयपीएलने स्पर्धा स्थगित केली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी खेळाडू आणि पदाधिकारी, प्रशिक्षक यांची सुरक्षा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असल्याचं सांगितलं. सध्या ७ दिवसांसाठी स्पर्धा स्थगित झाल्याचं बीसीसीआयने कळवलं.
  • ऑगस्ट महिन्यातील बांगलादेश विरुद्धची मालिका भारतीय संघ खेळण्याची शक्यता नाही. किंवा सप्टेंबरमध्ये होणारा आशिया चषकही अनिश्चित आहे. हे दिवस उर्वरित आयपीएल खेळवण्यासाठी वापरण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.