IPL Expansion : आणखी ३ वर्षांनी आयपीएलमध्ये ९४ सामने? संचालक धुमाळ यांनी दिले संकेत

याविषयी आयसीसीशी चर्चा सुरू असल्याचं धुमाळ म्हणाले.

48
IPL Expansion : आणखी ३ वर्षांनी आयपीएलमध्ये ९४ सामने? संचालक धुमाळ यांनी दिले संकेत
IPL Expansion : आणखी ३ वर्षांनी आयपीएलमध्ये ९४ सामने? संचालक धुमाळ यांनी दिले संकेत
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल-२०२८ पासून सामन्यांची संख्या ७४ वरून ९४ करण्याचा विचार बीसीसीआय (BCCI) करत आहे. लीगमध्ये फ्रँचाईजींची संख्या आता इतकीच म्हणजे १० असेल. पण, सर्वच्या सर्व संघांदरम्यान होम आणि अवे सामने खेळवण्याचा लीगचा विचार आहे. त्यासाठी आयपीएलने आयसीसीकडे (ICC) परवानगीही मागितली आहे. (IPL Expansion)

२०२५ मध्ये सुरुवातीला ८४ सामने खेळवण्याचे नियोजन होते, परंतु स्पर्धेच्या चौकटी आणि आंतरराष्ट्रीय व्यस्त कार्यक्रमामुळे स्पर्धा ७४ सामन्यांपर्यंत मर्यादित ठेवावी लागली.

(हेही वाचा – Crime : वसईतील सिमेंट कंपनीत अमली पदार्थाची निर्मिती, ८ कोटींचा एमडी जप्त)

आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी ईएसपीएनला सांगितले की, बीसीसीआय (BCCI) २०२८ मध्ये होणाऱ्या पुढील मीडिया-राइट्स सायकलपासून ९४ सामन्यांच्या फॉरमॅटची स्पर्धा आयोजित करण्याची योजना आखत आहे. ते पुढे म्हणाले, आम्ही आयसीसीशी (ICC) यावर चर्चा करत आहोत. आम्ही याबद्दल बीसीसीआयशीही बोललो आहोत. (IPL Expansion)

बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) म्हणाले की, आम्हाला एक मोठी विंडो हवी आहे, जेणेकरून प्रत्येक संघाला घरच्या मैदानावर आणि बाहेरच्या मैदानावर विरोधी संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. यासाठी तुम्हाला किमान ९४ सामने लागतील. त्याच वेळी, संघांची संख्या वाढवण्याबाबत धुमाळ म्हणाले की, सध्या १० संघांची संख्या चांगली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धेत उत्तम खेळ होणे आणि लोकांची रुची टिकून राहणे. (IPL Expansion)

२०२२ पासून, आयपीएलमध्ये (IPL) ७४ सामन्यांचा फॉरमॅट सुरू आहे, ज्यामध्ये संघांना ७ सामने घरच्या मैदानावर आणि ७ सामने इतर संघांच्या घरी खेळण्याची संधी मिळते, परंतु २०२८ पासून, घरच्या मैदानावर आणि बाहेर ९-९ सामने खेळण्याचा फॉरमॅट सुरू केला जाऊ शकतो. २०२२ पासूनच, गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) हे दोन नवीन संघ आयपीएलमध्ये खेळू लागले. २००८ मध्ये झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या दोन हंगामात प्रत्येकी ५९ सामने झाले. (IPL Expansion)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.