IPL 2026 : ‘मागच्या ५ वर्षांत १२० बळी. तरीही मी टी२० गोलंदाज नाही,’ शमीने निवड समितीला थेट सुनावले

IPL 2026 : ‘मागच्या ५ वर्षांत १२० बळी. तरीही मी टी२० गोलंदाज नाही,’ शमीने निवड समितीला थेट सुनावले

87
IPL 2026 : ‘मागच्या ५ वर्षांत १२० बळी. तरीही मी टी२० गोलंदाज नाही,’ शमीने निवड समितीला थेट सुनावले
IPL 2026 : ‘मागच्या ५ वर्षांत १२० बळी. तरीही मी टी२० गोलंदाज नाही,’ शमीने निवड समितीला थेट सुनावले
  • ऋजुता लुकतुके

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने टी-२० क्रिकेटमध्ये स्वतःकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना शमीने आपल्या कामगिरीचा उल्लेख करत टीका करणाऱ्यांवर आणि निवडकर्त्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.(IPL 2026)

शमी म्हणाला की, इंडियन प्रीमियर लीगमध्ये गेल्या ५-६ हंगामांत त्याने सुमारे १३० विकेट्स घेतल्या आहेत, तरीही त्याला “टी-२० साठी योग्य गोलंदाज नाही” असे म्हटले जाते. “माझे आकडे पाहा, आयपीएलमध्ये माझ्यासारखी कामगिरी कोणत्याही भारतीय गोलंदाजाची नाही. तरीही मला टी-२० गोलंदाज मानले जात नाही. अजून काय अपेक्षा आहेत?” असा सवाल त्याने उपस्थित केला.(IPL 2026)

(हेही वाचा – IPL 2026 : राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ स्टारची तुलना विराट कोहलीशी का होतेय? )

शमीच्या या वक्तव्यामुळे भारतीय संघाच्या निवड धोरणांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. विशेषतः २०२३ च्या वनडे विश्वचषकात त्याने सर्वाधिक विकेट्स घेत शानदार कामगिरी केली होती. मात्र, टी-२० संघातून त्याची सतत अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.(IPL 2026)

त्याचा शेवटचा टी-२० सामना फेब्रुवारी २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध झाला होता. त्यानंतर त्याला या फॉरमॅटमध्ये संधी मिळालेली नाही. काही जणांच्या मते, भारतीय संघ व्यवस्थापन तरुण गोलंदाजांना अधिक संधी देत आहे, त्यामुळे शमीसारख्या अनुभवी खेळाडूंना बाजूला ठेवले जात आहे.(IPL 2026)

पॉडकास्टमध्ये शमीने आणखी एक मुद्दा मांडला—सोशल मीडियावरील ‘पीआर’ कमी असल्यामुळेही त्याला अपेक्षित मान्यता मिळत नसावी. त्याने मान्य केले की, आजच्या काळात प्रतिमा तयार करणे महत्त्वाचे झाले आहे.(IPL 2026)

सध्या ३५ वर्षीय शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवण्याची त्याची जिद्द कायम आहे.(IPL 2026)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.