-
ऋजुता लुकतुके
विराट कोहलीने आपल्याला पाठलागांचा बादशाह का म्हणतात हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. लखनौ सुपरजायंट्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ३० चेंडूंत ५४ धावा करत बंगळुरूला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. २२७ धावांचा पाठलाग करताना विराटने तब्बल १० खणखणीत चौकार लगावत संघाची धावगतीही मजबूत राहील हे पाहिलं. शिवाय या हंगामात पाठलाग करताना त्याने सहावं अर्धशतक लगावलं. या अनेक विक्रमांबरोबरच आणखी एक असा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे, जो देशातील इतर कुठल्याही लीगमध्ये कुणी आजवर केलेला नाही. (IPL 2025, Virat Kohli)
एखाद्या लीगमध्ये एकाच संघाकडून खेळताना त्याने ९,००० धावांचा टप्पा पार केला आहे. लखनौ विरुद्ध खेळताना तो २४ धावांवर होता, तेव्हाच त्याने ९,००० धावांचा टप्पा ओलांडला. विराट कोहलीच्या पाठोपाठ रोहित शर्मा आहे ज्याने मुंबई इंडियन्ससाठी ६,०६० धावा केल्या आहेत. (IPL 2025, Virat Kohli)
(हेही वाचा – Suicide : स्किझोफ्रेनिया ग्रस्त तरुणीची २३ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या)
एकाच संघाकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
९,००४ धावा – विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
६,०६० धावा – रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)
५,९३४ धावा – जेम्स विन्स (हँपशायर)
५,५२८ धावा – सुरेश रैना (चेन्नई सुपरकिंग्ज)
५,३१४ धावा – महेंद्रसिंग धोनी (चेन्नई सुपरकिंग्ज)
इतकंच नाही तर या अर्धशतकाबरोबरच विराटने या हंगामात ६०० धावा पूर्ण केल्या. एकूण ५ हंगामात त्याने ६०० च्या वर धावा केल्या आहेत. हा ही एक विक्रमच आहे. (IPL 2025, Virat Kohli)
(हेही वाचा – Mumbai Crime : मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; बॅगेत सापडली चिठ्ठी)
आयपीएल हंगामात ६०० पेक्षा जास्त धावा सर्वाधिक वेळा करणारे फलंदाज
५ – विराट कोहली (२०१३, २०१६, २०२३, २०२४ व २०२५)
४ – के. एल. राहुल (२०१८, २०२०, २०२१ व २०२२)
३ – ख्रिस गेल (२०११, २०१२ व २०१३)
३ – डेव्हिड वॉर्नर (२०१६, २०१७ व २०१९)
२०२५ च्या हंगामात विराट कोहलीने १३ सामन्यांत आतापर्यंत ६०२ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ६० धावांची आहे. तर स्ट्राईकरेट १५० धावांचा आहे. त्याने तब्बल ८ अर्धशतकं ठोकली आहेत. त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या नाबाद ७३ इतकी आहे. (IPL 2025, Virat Kohli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community