IPL 2025, Virat Kohli : आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नावावर अभूतपूर्व विक्रम

IPL 2025, Virat Kohli : विराटने पुन्हा एकदा आयपीएलच्या एका हंगामात ५०० धावा पूर्ण केल्या.

101
IPL 2025, RCB Champions : किंग कोहलीची आणखी एका आयपीएल विक्रमाला गवसणी
IPL 2025, RCB Champions : किंग कोहलीची आणखी एका आयपीएल विक्रमाला गवसणी
  • ऋजुता लुकतुके

फलंदाजीतील सातत्य हा विराट कोहलीच्या खेळाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. या हंगामातही त्याने आतापर्यंत ११ सामन्यांत ५०५ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे हंगामात ५०० हून जास्त धावा करण्याची त्याची ही आठवी खेप आहे. आणि हा एक विक्रम आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विराटने ३३ चेंडूंत ६२ धावा केल्या. यावेळी त्याने ऑरेंज कॅपही परत मिळवली. या हंगामात आतापर्यंत विराट कोहीलीची सरासरीही ६३ धावांची तगडी आहे. त्याचा स्ट्राईकरेट १४३ धावांचा आहे. शिवाय एकाच हंगामात त्याचं हे सातवं अर्धशतकही होतं. (IPL 2025, Virat Kohli)

विराटने बेथेलच्या सहाय्याने बंगळुरूला ९७ धावांची सलामी करून दिली आणि या पायाभरणीच्या जोरावर चेन्नईविरुद्ध बंगळुरूने निर्धाकित २० षटकांत २११ धावा केल्या. याला उत्तर देताना रवींद्र जडेजा आणि आयुष म्हात्रे यांनी तगडी लढत दिली. पण, तरीही चेन्नईला दोन धावा कमीच पडल्या. आयपीएलमध्ये प्रथमच बंगळुरू संघाने चेन्नईचा एकाच हंगामात दोनदा पराभव केला. यापूर्वी चेन्नईत झालेला सामना त्यांनी ५० धावांनी जिंकला होता. (IPL 2025, Virat Kohli)

(हेही वाचा – Maharashtra HSC Results 2025 : बारावीचा निकाल जाहीर ; यंदाही कोकण विभागाने मारली बाजी)

विराट कोहलीबद्दल सांगायचं तर २०११ मध्ये विराट कोहलीचा आयपीएलमध्ये पहिल्यांदा प्रभाव दिसून आला. त्याने या हंगामात ५५७ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१३ (६३४), २०१५ (५०५), २०१६ (९७३), २०१८ (८५०), २०२३ (६३९) आणि २०२४ (७४१) अशा धावा विराटने केल्या आहेत. २०१६ मध्ये विराटने केलेल्या ९७३ धावा या एका हंगामात कुठल्याही फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. तो ही एक विक्रमच आहे. या हंगामात विराटने विक्रमी ४ शतकं केली होती. के. एल. राहुलने सहावेळा तर शिखर धवनने ५ वेळा हंगामात ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. विराट कोहली २००८ पासून सलग १८ हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रँचाईजीकडून खेळला आहे. (IPL 2025, Virat Kohli)

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक हंगामांमध्ये ५०० हून अधिक धावा करणारे फलंदाज : 
  • विराट कोहली – ८
  • डेव्हिड वॉर्नर – ७
  • के. एल. राहुल – ६
  • शिखर धवन – ५

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.