IPL 2025, Virat Kohli : विराट आणि अनुष्का बनले संघ सहकारी; लखनौमध्ये रंगला पिकलबॉलचा खेळ

IPL 2025, Virat Kohli : बंगळुरूच्या खेळाडूंनी काही वेळ पिकलबॉलचा आनंद लुटला. 

49
IPL 2025, Virat Kohli : विराट आणि अनुष्का बनले संघ सहकारी; लखनौमध्ये रंगला पिकलबॉलचा खेळ
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर तो सध्या मैदानाबाहेर बऱ्याच वेगळ्या गोष्टींचा आनंद लुटताना दिसत आहे. शिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने बाद फेरीतील स्थानही निश्चित केलं आहे. त्याचाही हा परिणाम असावा. मंगळवारी सराव करताना बंगळुरूच्या गोटात हसतं खेळतं वातावरण होतं. खेळाडूंनी प्रत्यक्ष क्रिकेटच्या सरावापूर्वी काही वेळ पिकलबॉलचा आनंद लुटला. यात विराटबरोबर त्याची पत्नी अनुष्का शर्माही सहभागी झाली होती. दोघं दुहेरी खेळताना एकाच संघात होते. (IPL 2025, Virat Kohli)

बंगळुरू फ्रँचाईजीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या पिकलबॉल सत्राचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यात एक गुण कमावल्यानंतर विराट आणि अनुष्का हाय-फाय देत आनंद साजरा करताना दिसतात. आयपीएल पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांचा १७ तारखेचा सामना पावसात वाहून गेला आणि पुढील सामना शुक्रवारी होणार आहे. त्यामुळे संघाला किमान ६ दिवस विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे खेळाडू असे विविध खेळ खेळून एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. (IPL 2025, Virat Kohli)

(हेही वाचा – Thackeray VS Thackeray : ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ की ‘ठाकरे सोबत ठाकरे’?)

विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबरोबरचा हा अठरावा हंगाम आहे. यंदा संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कारण, यापूर्वी एकदाही बंगळुरू फ्रँचाईजीने ही लीग जिंकलेली नाही. पण, पण, १८ हंगामात १० वेळा त्यांनी बाद फेरी गाठली आहे. चेन्नई सुपर किंग्ज १३ तर मुंबई इंडियन्स १२ हे दोनच संघ या बाबतीत त्यांच्या पुढे आहेत. (IPL 2025, Virat Kohli)

स्वत: विराट कोहलीने आतापर्यंत १० आयपीएल हंगामात ५०० हून जास्त धावा केल्या आहेत. आताही ११ सामन्यांत ५०५ धावा करत तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. कसोटीतून निवृत्ती स्वीकारल्यानंतर विराट कोहलीला पाहण्यासाठी प्रेक्षकही मोठ्या संख्येनं सामन्याला गर्दी करत आहेत. आणि चाहत्यांच्या साक्षीने लीग जिंकण्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रयत्न असेल. (IPL 2025, Virat Kohli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.