-
ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानावर उतरला तरी नवीन विक्रम होतो, अशी सध्या परिस्थिती आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यांत त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकलं. राजस्थानने नाणेफेक जिंकून बंगळुरूला पहिला फलंदाजी दिल्यावर विराटने ४२ चेंडूंत ७० धावा केल्या. यात त्याने २ षटकार आणि ८ चौकार लगावले. हे करताना त्याने पहिली फलंदाजी करत आपलं ६२ वं अर्धशतक झळकावलं. पाकिस्तानच्या बाबर आझमला आता त्याने मागे टाकलं आहे. बाबरने पहिली फलंदाजी करताना एकूण ६१ वेळा अर्धशतक केलं आहे. (IPL 2025, Virat Kohli)
(हेही वाचा – IPL 2025, RCB vs RR : अखेर घरच्या मैदानावर बंगळुरूचं नशीब पालटलं, रंगतदार सामन्यात राजस्थानचा ११ धावांनी पराभव)
महत्त्वाचं म्हणजे या सामन्यात जसं बंगळुरू फ्रँचाईजीने आपलं घरच्या मैदानातील अपयशाची मालिका थांबवली. तसंच विराटनेही घरच्या मैदानावरील धावांचा दुष्काळ संपवला. बंगळुरूचा या हंगामातील चिन्नास्वामीवरील हा पहिलाच विजय होता. तर विराटचं पहिलंच अर्धशतक. आधीच्या ३ सामन्यांत मिळून त्याने इथं ३० धावा केल्या होत्या. (IPL 2025, Virat Kohli)
(हेही वाचा – बेजबाबदार विधाने करू नका; वीर सावरकर अवमानप्रकरणी Rahul Gandhi यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले)
Another Day, Another Masterclass 👏
Virat Kohli lights up Chinnaswamy with 70 (42) 👌
🔽 Watch | #TATAIPL | #RCBvRR | @imVkohli
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2025
या अर्धशतकानंतर विराट कोहली आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आतापर्यंत ९ सामन्यांत त्याने ३९२ धावा केल्या आहेत त्या ६५.३३ च्या सरासरीने. त्याचा स्ट्राईक रेटही १४४.११ असा तगडा आहे आणि त्याच्या नावावर आतापर्यंत ५ अर्धशतकं आहेत. नाबाद ७३ ही त्याची हंगामातील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध विराटने देवदत्त पड्डिकलबरोबर ९५ धावांची भागिदारीही केली. पड्डिकलने २७ चेंडूंत ५० धावा केल्या. दोघांचं अर्धशतक आणि त्यांना फील सॉल्ट (२१), टीम डेव्हिड (२३) तसंच जितेश शर्मा (२०) यांनी समयोचित साथ दिल्यामुळे निर्धारित २० षटकांत बंगळुरूने ५ गडी गमावत २०६ धावा केल्या. याला उत्तर देताना राजस्थानचा संघ २० षटकांत ९ बाद १९४ धावा करू शकला. जोस हेडलवूडने ३३ धावांत ४ बळी मिळवले. (IPL 2025, Virat Kohli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community