-
ऋजुता लुकतुके
सध्या आयपीएलमध्ये वैभव सुर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) १४ व्या वर्षी केलेल्या घणाघाती शतकाचीच जास्त चर्चा आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) १३ व्या वर्षी १.१ कोटी रुपये मोजून त्याला खरेदी केलं होतं. आणि १४ व्या वर्षी आयपीएल (IPL 2025) खेळायची संधी त्याला मिळाली तेव्हा तिसऱ्याच सामन्यात वैभवने ३८ चेंडूंत १०१ धावांची खेळू रचून सगळ्यांना बोटं आश्चर्याने तोंडात घालायला लावली. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि राशिद खान या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या गोलंदाजांना त्याने षटकारांचा प्रसाद दिला. त्याचं शतक पूर्ण झालं तेव्हा राजस्थानचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडलाही (Rahul Dravid) व्हीलचेअरमधून उठून जल्लोष करावासा वाटला.
राहुल द्रविड (Rahul Dravid) स्थानिक क्रिकेट खेळताना झालेल्या दुखापतीमुळे सध्या व्हीलचेअरला आहे. पण, आपली वेदना विसरून तो ही उभा राहिला. ‘राहुल द्रविडनेच लिलावात वैभवची (Vaibhav Suryavanshi) निवड केली होती. त्याच्यावर कायम विश्वास दाखवला आहे. त्यामुळे वैभवला यश मिळालं, तर राहुल द्रविडला (Rahul Dravid) आनंद होणारच. तोच त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. खेळाडूंवर मेहनत घेणं हा राहुल द्रविडचा खास स्वभाव आहे. देशासाठी एक लाख मोलाचा कुशल खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न आम्ही राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) ड्रेसिंग रुममध्ये करत आहोत,’ असं राजस्थान संघाचे व्यवस्थापक रोमी भिंदर म्हणाले. (IPL 2025)
(हेही वाचा – Bus Ticket Price Hike : मागील सहा वर्षांत दैनंदिन प्रवाशी संख्येत पावणे सात लाखांनी वाढ; पण २०० कोटींनी उत्पन्न घटले)
भिंदर यांनी राजस्थानच्या चेन्नई आणि बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यांची आठवणही सांगितली. ‘चेन्नई विरुद्धच्या सामन्यापूर्वी वैभव महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) भेटला. त्याने ‘राजस्थानका बच्चा,’ असं त्याचं वर्णन केलं. आणि हा बच्चा प्रगल्भ क्रिकेटपटूसारखे फटके खेळत आहे,’ असं धोनी भिंदर यांना म्हणाला. भिंदर यांना धोनी आणि वैभवमध्ये आणखी एक सामन्य दिसतं. दोघंही शांत डोक्याने आणि डोकं वापरून खेळणारे खेळाडू आहेत. असं भिंदर यांनी सांगितलं. (IPL 2025)
वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) विराट कोहलीचा (Virat Kohli) मोठा चाहता आहे. आणि बंगळुरू विरुद्ध खेळताना विराट आणि त्याचीही भेट झाली. विराटने वैभवला डोकं जमिनीवर ठेवून फलंदाजीवर सातत्याने मेहनत घेण्याचा सल्ला दिला. विराटशी झालेल्या भेटीनंतर वैभव भावूक झाला होता, असं भिंदर म्हणाले. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community