IPL 2025, Vaibhav Suryavanshi : ‘आई फक्त ३ तास झोपायची!’ क्रिकेटसाठी आई-वडिलांनी केलेल्या त्यागामुळे वैभव सुर्यवंशी भावूक

आयपीएलमध्ये शतक झळकवणारा वैभव वयाने सगळ्यात लहान भारतीय ठरला आहे.

88
IPL 2025, Vaibhav Suryavanshi : 'वैभव सुर्यवंशी रोज ४५० चेंडू खेळायचा'; प्रशिक्षकांनी सांगितली वैभवची तयारी
  • ऋजुता लुकतुके

राजस्थान रॉयल्सचा १४ वर्षीय डावखुरा सलामीवीर वैभव सुर्यवंशीचं (Vaibhav Suryavanshi) आयुष्य रातोरात बदललं आहे. आधीच १३ व्या वर्षी त्याने १.१ कोटी रुपयांचं कंत्राट आपल्या फलंदाजीच्या जोरावर मिळवलं होतं. आता ते सार्थ ठरवताना त्याने हंगामातील शेवटच्या दोन सामन्यांत धमाल उडवून दिली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) ३५ चेंडूंत १०३ धावा करताना तो आयपीएलमधील (IPL 2025) भारताचा वयाने सगळ्यात क्रिकेटपटू ठरला आहे. गुजरातने समोर ठेवलेलं २१० धावांचं आव्हान त्याच्या जोरावर राजस्थानने आरामात पार केलं. एकूण ११ षटकार आणि ७ चौकार त्याने लगावले.

(हेही वाचा – राणी बागेतील Penguin पक्ष्यांना पडते जागा कमी; महापालिकेने उचलले ‘हे’ पाऊल)

या शतकानंतर वैभवने आयपीएलमध्ये (IPL 2025) आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. पण, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तो काहीसा भावूक झाला होता. आई-वडिलांचे इतक्या वर्षांचे कष्ट डोळ्यासमोरून हटत नसल्याचं तो म्हणाला. ‘आता मिळालेलं यश माझ्या आई – वडिलांचं आहे. जे काही आहे, ते सगळं त्यांचं आहे. माझी आई पहाटे उठून माझ्यासाठी जेवण बनवायची. फक्त तीन तास झोपायची ती. माझ्या वडिलांनी त्यांचा उद्योग सोडला. आता मोठा भाऊ हा उद्योग बघतो. वडिलांना वाटलं की, मी क्रिकेटमध्ये काही तरी करू शकेन. आणि त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. आई-वडील आणि भाऊ यांच्या त्यागामुळे मी इथंवर पोहोचलो आहे. त्यांच्या पाठिंब्याला तोड नाही,’ असं वैभव ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडिओत म्हणाला.

(हेही वाचा – Crime : धर्म विचारत तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार करुन जीवघेणा हल्ला)

वैभव सुर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) गुजरात टायटन्सविरुद्घ सुरूवात केली तीच षटकाराने. मोहम्मद सिराजचा (Mohammed Siraj) हा चेंडू त्याने ८० मीटर दूर सीमापार भिरकावून दिला. सिराजनेही पुढे येऊन त्यासाठी वैभवचं कौतुक केलं. त्यानंतर राशिद खानची (Rashid Khan) फिरकीही त्याने अशीच खेळून काढली. त्यामुळे गुजरातकडे वैभवच्या या घणाघाताचं उत्तरच नव्हतं. आणि वैभव खेळत राहिला तसा राजस्थानचा विजयही सुकर होत गेला. अकराव्या षटकांतच वैभवचं शतक पूर्ण झालेलं होतं. आणि राजस्थानसाठी विजय अवाक्यात आलेला होता. फक्त ३८ चेंडूंत १०३ धावा केल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाच्या (Prasidh Krishna) एका यॉर्करवर वैभव बाद झाला.

त्यानंतर राजस्थानने हा सामना ८ गडी राखून जिंकला. वैभव सुर्यवंशीनेच (Vaibhav Suryavanshi) सामनावीराचा किताब जिंकला हे वेगळं सांगायला नको. आता वैभव बरोबरच चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सलामीवीर १७ वर्षीय आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) यांना भारतीय अ संघाबरोबर इंग्लंडच्या दौऱ्यावर पाठवण्यात येणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.