IPL 2025 : आयपीएलच्या नवीन वेळापत्रकाचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमावर होईल ‘हा’ परिणाम

IPL 2025 : आयपीएलचा अंतिम सामना ३ जूनला होणार आहे.

45
IPL 2025 : आयपीएलच्या नवीन वेळापत्रकाचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमावर होईल 'हा' परिणाम
  • ऋजुता लुकतुके

भारत – पाकिस्तान दरम्यानचा सीमेवरील तणाव निवळल्यानंतर बीसीसीआयने सुधारित वेळापत्रक सोमवारी जाहीर केलं आहे. त्यानुसार, एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर आता आयपीएल स्पर्धा १७ मेला पुन्हा सुरू होत आहे. उर्वरित १४ सामने ३ जूनपर्यंत होणार आहेत. ३ जूनलाच अंतिम सामना होणार आहे. ७ तारखेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्याने आयपीएलला पुन्हा सुरुवात होईल. यापूर्वी रद्द झालेला पंजाब विरुद्घ दिल्ली हा सामनाही २४ तारखेला पुन्हा खेळवण्यात येणार आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – ‘ऑपरेशनआधी मला काहीही माहित नव्हते, पण जेव्हा…’; Operation Sindoor नंतर एअर मार्शल एके भारतींच्या वडिलांची भावना)

आता नवीन टप्प्यात ६ ठिकाणी आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत आणि बाद फेरीच्या सामन्यांचं ठिकाण अजून निश्चित झालेलं नाही. पण, आयपीएलच्या बदललेल्या कार्यक्रमाचा परिणाम काही आंतरराष्ट्रीय मालिकांवर होणार आहे. भारतासाठीच जून महिन्यातील इंग्लंड दौरा महत्त्वाचा आहे आणि त्यापूर्वी भारतीय अ संघ इंग्लिश अ संघाशी दोन हात करणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारतीय संघाच्या तयारीच्या दृष्टीने अ संघाच्या दौऱ्याला महत्त्व दिलं आहे. आणि या संघाबरोबरच इंग्लंडला जाण्याची तयारी चालवली आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – भारतासमोर पाकिस्तान नरमला; चुकून पाकिस्तानच्या हद्दीत घुसलेल्या BSF जवानाला मुकाटपणे भारताच्या स्वाधीन केले)

या दौऱ्यात भारतीय अ संघ ३० जूनला आपला पहिला सामना खेळणार आहे. तर दुसरा सामना ६ जूनला असेल. लगेचच २० जूनला इंग्लंड विरुद्धची पहिली कसोटी सुरू होत असल्यामुळे अ संघाचे सामने महत्त्वाचे असणार आहेत. आघाडीचे भारतीय खेळाडूच त्यामुळे बाद फेरीच्या टप्प्यात आयपीएल सोडतील हे जवळ जवळ नक्की आहे. त्यामुळे बीसीसीआयलाही खेळाडूंच्या उपलब्धतेचा विचार करावा लागणार आहे. शिवाय ११ जूनला ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे काही ऑस्ट्रेलियन खेळाडूही आयपीएलसाठी परतण्यास उत्सुक नाहीत. इंग्लिश क्रिकेट मंडळानेही आपल्या खेळाडूंना ताकीद दिली आहे. कारण, २० जूनला सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या मालिकेसाठी खेळाडूंची उपलब्धता ठरवण्यासाठी ते रणनीती आखत आहेत. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.