-
ऋजुता लुकतुके
आयपीएलमध्ये (IPL 2025) एका नवीन झिंबाब्वेच्या (Zimbabwe) खेळाडूचा प्रवेश झाला आहे. त्याचं वर्णन ऐकल्यावर तुमची मान वर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण, झिंबाब्वेचा हा खेळाडू आहे ६ फूट ८ इंच उंच. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) ब्लेसिंग मुझाराबानीला (Blessing Muzarabani) ७५ लाख रुपयांच्या किमतीवर करारबद्ध केलं आहे. एनगिडीच्या (Lungi Ngidi) जागी मध्यमगतीचा गोलंदाज म्हणून तो संघात येणार आहे. त्याच्या भारदस्त उंचीमुळे मुझाराबानीच्या नावाची चर्चा आतापासून सुरू झाली आहे.
लुंगी एनगिडीची (Lungi Ngidi) निवड दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) कसोटी संघात झाली आहे. आणि आफ्रिकन संघ येत्या ११ जूनला ऑस्ट्रेलियाशी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दोन हात करणार आहे. त्यामुळे २९ मे पासून बाद फेरीला सुरुवात झाली की, एनगिडी आयपीएल (IPL 2025) सोडून आफ्रिकन संगासाठी आयोजित शिबिरात दाखल होणार आहे. त्याचा बदली खेळाडू म्हणून बंगळुरू फ्रँचाईजीने मुझाराबानीची निवड केली आहे. एनगिडी बंगळुरू फ्रँचाईजीचा शेवटचा साखळी सामना खेळणार असल्याचं फ्रँचाईजीने स्पष्ट केलं आहे. हा सामना २७ मे ला होणार आहे.
(हेही वाचा – “भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू हरपला” ; Dr. Jayant Narlikar यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली)
Standing at 6’8”, bowling from a higher trajectory – Muzarabani is truly a 𝑩𝒍𝒆𝒔𝒔𝒊𝒏𝒈 to have in the side.
Pace, bounce, and that steep angle – make him hard to score off and he’s adding all the skills to our attack! 💥🔥#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/f2KZmFsqOc
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 19, 2025
(हेही वाचा – KL Rahul For T20 : के एल राहुलचा भारतीय टी-२० संघासाठी विचार?)
२८ वर्षीय मुझाराबानी आयपीएलमध्ये खेळणारा फक्त चौथा झिंबाब्वेचा खेळाडू आहे. यापूर्वी सिकंदर रझा, रे प्राईस, ततेंदू तायबू आणि ब्रँडन टेलर हे खेळाडू आयपीएलमध्ये खेळले आहेत. २८ वर्षीय मुझाराबानी उसळते चेंडू टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. झिंबाब्वेकडून ७० टी-२० सामने खेळताना त्याने ७८ बळी मिळवले आहेत. आणि तो राष्ट्रीय संघाकडून १२ कसोटी आणि ५५ एकदिवसीय सामनेही खेळला आहे.
लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाविरुद्ध मुझाराबानी आपला पहिला सामना खेळेल अशी आशा आहे. आणि तिथून बाद फेरीतही तो खेळताना दिसू शकतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) संघ सध्या १७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. हे स्थान टिकवण्यासाठी आणखी एक सामना जिंकण्याची गरज आहे. त्यांचे दोन सामने अजून बाकी आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community