आयपीएल २०२५ (IPL 2025) च्या ६८ व्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबाद संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा ११० धावांनी पराभव केला. यासह, सनरायझर्स हैदराबाद संघाने आपल्या हंगामाचा शेवट विजयाने केला, तर केकेआर संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या हंगामात सनरायझर्सने सलग तिसरा विजय नोंदवला आणि १३ गुणांसह हंगामाचा शेवट सहाव्या स्थानावर केला. तर कोलकाता १२ गुणांसह आठव्या स्थानावर राहिला. (IPL 2025)
दोन्ही संघांसाठी, हंगामाची सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती, त्याच पद्धतीने शेवटही झाला. कोलकाता संघाला हंगामातील पहिल्याच सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला होता. शेवटच्या सामन्यातही या संघाला आपले नशीब बदलता आले नाही. दुसरीकडे, सनरायझर्सने आयपीएल २०२५ मध्ये त्यांच्या पहिल्याच सामन्यात २८६ धावांचा मोठी धावसंख्या उभारली होती. त्या सामन्यात इशान किशनने शानदार शतक झळकावले होते आणि संघाला मोठा विजय मिळाला होता. आता त्यांच्या शेवटच्या सामन्यातही सनरायझर्सने २७८ धावांची आश्चर्यकारक धावसंख्या उभारली, ज्यामध्ये हेनरिक क्लासेनचे वादळी शतक होते आणि नंतर मोठा विजय मिळवला. (IPL 2025)
या सामन्यात सनरायझर्सने प्रथम फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेडने अभिषेक शर्मासह केवळ ७ षटकांत ९२ धावांची भागीदारी केली. यानंतर, हेड आणि क्लासेन यांनी कोलकाताच्या गोलंदाजांना झोडपले. दोघांनी मिळून ८३ धावा जोडल्या आणि १३ व्या षटकापर्यंत संघाने १७५ धावा केल्या होत्या. येथून पुढे फक्त क्लासेनचे वादळ पाहायला मिळाले, ज्याने प्रथम फक्त १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर ३७ व्या चेंडूत शतक पूर्ण केले. हैदराबादने २० षटकांत ३ गडी गमावून २७८ धावा केल्या, जी आयपीएलच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. (IPL 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community