IPL 2025, Shardul Thakur : आयपीएलमध्ये शार्दूल ठाकूरचं एक षटक ११ चेंडूंचे; टाकले ५ वाईड चेंडू

IPL 2025, Shardul Thakur : शार्दूल ठाकूरच्या सलग ५ वाईड चेंडूंमुळे रिषभ पंतचा चेहरा पडला होता. 

354
IPL 2025, Shardul Thakur : आयपीएलमध्ये शार्दूल ठाकूरचं एक षटक ११ चेंडूंच; टाकले ५ वाईड चेंडू
  • ऋजुता लुकतुके

एकीकडे लखनौ सुपर जायंट्स संघ विजयासाठी धडपडतोय आणि त्यातच संघाचा महत्त्वाचा गोलंदाज शार्दूल टाकूरने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात एका षटकात तब्बल ५ वाईड चेंडू टाकले. अखेर २३५ धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघाला फक्त ४ धावा कमी पडल्या. त्यामुळे शार्दूलचे हे वाईड चेंडू संघासाठी वाईट संकेत घेऊन आले नाहीत. सामन्यातील कोलकात्याच्या डावातील हे १३ वं षटक होतं. प्रतिस्पर्धी संघाला विजयासाठी ४८ चेंडूंत ९३ धावा हव्या होत्या. षटकातील पहिले पाच चेंडू शार्दूलने वाईड टाकले. (IPL 2025, Shardul Thakur)

(हेही वाचा – जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा सुनावताना Terrorist हसत होते; बॉम्बस्फोटात ७१ जणांचा झालेला मृत्यू)

फलंदाजी करत असलेला अजिंक्य रहाणे जागेवरून हललाही नाही, इतके ते चेंडू त्याच्यापासून लांब होते. यॉर्कर टप्प्यावर गोलंदाजी करताना फलंदाजाला चेंडू खेळण्यासाठी त्याचा पाठलाग करावा लागावा ही त्याची रणनीती होती. पण, चेंडू अती स्विंग होत असावा. त्यावर नियंत्रण मिळवणं शार्दूलला कठीण गेलं. यष्टीमागे उभ्या असलेल्या कर्णधार पंतला त्यामुळे काय प्रतिक्रिया द्यावी तेच सुचेना. तो फक्त शार्दूलकडे पाहत बसला. पाचवा वाईड चेंडू पडला तो तर निळ्या रेषेच्या बाहेर होता. ठाकूरला या चेंडूवर तिसऱ्या पंचांकडे दाद मागायची होती. पण, वैतागलेल्या पंतने ही फेटाळून लावली. पंतचा चेहरा तेव्हा बघण्यासारखा झाला होता. (IPL 2025, Shardul Thakur)

(हेही वाचा – Kedar Jadhav : माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवची नवीन राजकीय इनिंग, भाजपामध्ये प्रवेश)

पण, तरीही हे षटक लखनौसाठी सामन्याला कलाटणी देणारं ठरलं. कारण, ५ वाईड टाकल्यानंतर अखेर शार्दूलने आपलं षटक पूर्ण केलं, तेव्हा सहाव्या चेंडूवर त्याला चक्क कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा बळी मिळाला. रहाणे तेव्हा ३५ चेंडूंत ६१ धावा करून खेळत होता. हा चेंडू त्याला कळला नाही. त्याने आधीच बॅट फिरवली. आणि निकोलस पुरनकडे झेल देत तो बाद झाला. कोलकाता संघासाठी हा मोठा धक्का ठरला. कारण, त्यानंतर रमणदीप आणि अंगक्रिश रघुवंशी हे पुढील दोन फलंदाजही झटपट बाद झाले. रिंकू सिंगने तळाला येत नाबाद ३८ धावा केल्या. पण, हे प्रयत्न अपुरे पडले. आणि कोलकाता संघाला २३८ धावांचा पाठलाग करताना ४ धावा कमी पडल्या. (IPL 2025, Shardul Thakur)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.