IPL 2025, Rohit Sharma : ‘त्याची जाण्याची वेळ आता आलीय,’ – विरेंद्र सेहवाग

सेहवागने रोहितच्या फॉर्मवर थेट टिप्पणी केली आहे.

116
IPL 2025, Rohit Sharma : ‘त्याची जाण्याची वेळ आता आलीय,’ - विरेंद्र सेहवाग
IPL 2025, Rohit Sharma : ‘त्याची जाण्याची वेळ आता आलीय,’ - विरेंद्र सेहवाग
  • ऋजुता लुकतुके

यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2025) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) ०, ८, १३, १७, १८ आणि २६ धावा केल्या आहेत. यापूर्वी मुंबई इंडियन्सना ५ लीग विजेतेपदं मिळवून देणारा रोहित गेल्या दोन हंगामात फॉर्मशी झगडतोय. गुरुवारी सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) मुंबईने त्याच्याविषयीची आपली रणनीती कायम ठेवली. त्याला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आणलं. पण, त्याचा खराब फॉर्म सुरूच राहिला. २६ धावा करून तो बाद झाला. यावर भारताचा माजी घणाघाती सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) थेट भाष्य केलं आहे.

आपला गतलौकिक टिकवण्यासाठी रोहितने आता टी-२० प्रकारापासून दूर राहण्याची गरज आहे, असं स्पष्ट मत सेहवागने (Virender Sehwag) व्यक्त केलं आहे. सेहवागने रोहितच्या मागच्या १० आयपीएलमधील कुंडली काढली आहे. आणि या वर्षांत त्याने एकदाच हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा केल्याचं अधोरेखित केलं.

(हेही वाचा – Mumbai Fire Brigade : अभिनेते सोनू सुदने मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांचे ‘या’ शब्दांत केले कौतुक)

‘त्याची जाण्याची वेळ आलेली आहे. खेळाडूने निवृत्त होण्यापूर्वी चाहत्यांसाठी चांगल्या आठवणी आणि लौकिक मिळवून जायला हवं. त्यासाठी रोहित (Rohit Sharma) निवृत्त होण्याची हीच वेळ योग्य आहे. त्याने मागच्या १० वर्षांत फक्त एकदाच ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तो कायम म्हणतो, पॉवरप्लेमध्ये धावा करणं हे त्याचं उद्दिष्टं आहे. पण, त्या नादात तो मोठ्या धावा करत नाही. त्याने तसा विचार केला असता तर ५००, ६०० धावांचं उद्दिष्टं ठेवलं असतं. पण, तुमची कामगिरी चोख नसेल तर तुम्ही मागे ठेवून जात असलेली परंपरा मलिन होत असते,’ असं सेहवाग क्रिकबझ वेबसाईटशी बोलताना म्हणाला.

सेहवागने निदान १० चेंडू जास्त खेळावे आणि स्वत:ला जास्त धावा करण्याची संधी द्यावी असं सेहवागला वाटतं.

(हेही वाचा – Amaravati Airport : अमरावती-मुंबई विमानभाडे डबल; अनेकांचा हिरमोड)

सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या तेज त्रिकुटाच्या अचूक गोलंदाजीमुळे आणि विल जॅक्सने (Will Jacks) १३ धावांत २ बळी घेऊन फलंदाजांना रोखल्यामुळे मुंबईने सनरायझर्स हैद्राबादला निर्धारित २० षटकांत ५ बाद १६३ धावांतच रोखलं. आणि त्यानंतर हे आव्हान एक षटक शिल्लक असताना ४ गडी राखून पार केलं. रोहितने रायन रिकलटनच्या साथीने फलंदाजी सुरू केली. आणि आल्या आल्या त्याने ३ षटकार खेचले. पण, त्यानंतर मात्र तो चुकीचा फटका खेळून २८ धावांवर बाद झाला. रोहितची सरासरी यंदा फक्त १० धावांची आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.