IPL 2025, RCB vs RR : जोस हेझलवूडच्या कलाटणी देणाऱ्या षटकानंतर विराटने असा केला आनंद साजरा

IPL 2025, RCB vs RR : बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा ११ धावांनी पराभव केला.

50
IPL 2025, RCB vs RR : जोस हेझलवूडच्या कलाटणी देणाऱ्या षटकानंतर विराटने असा केला आनंद साजरा
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्याची नशा अजूनही चाहत्यांच्या मनातून उतरताना दिसत नाही. बंगळुरूने या सामन्यात ११ धावांनी निसटता विजय मिळवला. शेवटच्या ५ षटकांमध्ये सामन्याचं चित्र सतत दोलायमान होत होतं. पण, सामना विरोधात जात असताना तो खऱ्या अर्थाने फिरवला तो जोश हेझलवूडच्या एकोणीसाव्या षटकाने. आता सामना संपल्यानतंर दोन दिवसांनी तो प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (IPL 2025, RCB vs RR)

(हेही वाचा – Fire : अंधेरीमध्ये निवासी इमारतीला आग; एकाचा मृत्यू, सहा जण रुग्णालयात दाखल)

या षटकापेक्षा लोकांचं लक्ष जातंय ते विराट कोहलीने षटकानंतर साजऱ्या केलेल्या जल्लोषामुळे कोहलीने स्वत: फलंदाजीत चमक दाखवताना ४५ चेंडूंत ७३ धावा केल्या. देवदत्त पड्डिकलसह (२६ चेंडूंत ५० धावा) त्याने दुसऱ्या गड्यासाठी ९५ धावांची भागिदारी रचली. त्याच्या जोरावर बंगळुरूने राजस्थानसमोर विजयासाठी २०६ धावांचं आव्हान ठेवलं. पण, ध्रुव जुरेलच्या फटकेबाजीनंतर सामना बंगळुरुच्या हातून निसटताना दिसत होता. राजस्थानला शेवटच्या २ षटकांत १८ धावा हव्या होत्या आणि जुरेल मैदानात होता. पण, हेझलवूडने या षटकातील पहिल्याच चेंडूवर जुरेलला यष्टीरक्षक जितेश शर्माकडे झेल द्यायला भाग पाडलं. अचूक टप्प्यावरील हा चेंडू जुरेलला कळलाच नाही आणि पुढच्याच चेंडूवर त्याने जोफ्रा आर्चरलाही बाद केलं. तिथेच सामना फिरला. या सहा चेंडूंमध्ये हेझलवूडने २ बळींसह फक्त एक धाव दिली. सामना अलगद बंगळुरूच्या झोळीत आला आणि हे मैदानावरून पाहणाऱ्या विराट कोहलीला मग आनंद गगनात मावेनासा झाला. विराट पद्धचीने आरोळी ठोकत, जोरदार मूठ आवळत आणि बरोबरच्या साथीदारांना मिठी मारत विराटने आपला आनंद साजरा केला आणि तोच प्रसंग आता व्हायरल होतोय. (IPL 2025, RCB vs RR)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack नंतरही पाकच्या कुरापती थांबेना ! पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याने केला गळा चिरण्याचा इशारा)

या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सचा ९ सामन्यांत सातव्यांदा पराभव झाला आहे. तर बंगळुरू संघासाठी घरच्या मैदानावरील अपयशाच्या मालिकेला खिळ बसली आहे. सलग तीन पराभवांनंतर बंगळुरूमध्ये त्यांनी जिंकलेला हा पहिलाच सामना आहे. शिवाय गुण तालिकेत आता ते तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. आपल्या ९ सामन्यांत बंगळुरू फ्रँचाईजीने ६ सामने जिंकले आहेत. बंगळुरुचा पुढील सामना रविवारी दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. तर राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल मोहिमेत वापसी करायची असेल तर पठडीबाहेरचा खेळ करावा लागणार आहे. (IPL 2025, RCB vs RR)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.