IPL 2025, RCB vs RR : सुनील गावस्कर यांची रोबो कुत्रा चंपकबरोबर धमाल

IPL 2025, RCB vs RR : बंगळुरूतील सामन्यापूर्वीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

89
IPL 2025, RCB vs RR : सुनील गावस्कर यांची रोबो कुत्रा चंपकबरोबर धमाल
  • ऋजुता लुकतुके

बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यापूर्वी चिन्नास्वामी मैदानात एक वेगळाच खेळ रंगला होता. सामन्यापूर्वीच्या सादरीकरणात दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर आयपीएलच्या रोबो कुत्र्याबरोबर मैदानातच खेळताना दिसले. आयपीएलने यंदाच्या हंगामात हा यांत्रिक रोबो मैदानात आणला आहे आणि आयपीएलच्या प्रेक्षकांनाच त्यांनी या रोबो कुत्र्याचं नाव सुचवायला सांगितलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावरील पोलनुसार, त्याला चंपक हे नाव मिळालं. गुरुवारी या चंपकबरोबर सुनील गावस्कर यांनी मस्त वेळ घालवला आणि ते त्याच्याबरोबर पळतानाही दिसले. (IPL 2025, RCB vs RR)

७५ वर्षीय सुनील गावस्कर अगदी लहानांत लहान होऊन चंपकशी खेळत होते. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर तो क्षणार्धातच व्हायरल झाला आहे. ‘सनी जींना नवीन मित्र मिळाला आहे,’ असा मथळा आयपीएलने या पोस्टला दिला आहे. (IPL 2025, RCB vs RR)

(हेही वाचा – बेजबाबदार विधाने करू नका; वीर सावरकर अवमानप्रकरणी Rahul Gandhi यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले)

अर्थात, चिन्नास्वामीवरील पळापळीच्या या खेळात चंपकचा विजय झाला. भारतीय दूरचित्रवाणीवरील एक प्रसिद्ध धारावाहिक ‘तारक मेहता का उलटा चश्मा’मध्ये चंपकलाल गाडा नावाचं एक पात्र आहे. हुशार, प्रगल्भ आजोबा अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे हे नाव आयपीएलच्या चाहत्यांनी लगेचच निवडलं. आयपीएलचा हा हुशार ग्रॅडपा टीव्हीवरील हुशार आजोबांना चांगली लढत देईल, असं तेव्हा चंपक नाव निवडणाऱ्या चाहत्यांनी म्हटलं होतं. (IPL 2025, RCB vs RR)

चंपक हा एक आधुनिक रोबोट आहे आणि प्रत्येक सामन्यात तो सीमारेषेवर फिरतो. त्याच्या डोक्यावर बसवलेल्या कॅमेरातून तो लाईव्ह फोटो घेत असतो आणि हे फोटो तो सीमारेषेवर असलेल्या व्हिडिओग्राफरना पाठवतो. त्यातून त्यांना मैदानातील चांगल्या अँगलची कल्पना येते. हा रोबो उडी मारू शकतो. ३६० अंशात फिरू शकतो. मान उंचावू शकतो. तसंच सामन्याच्या वेळी नाणेफेकीला लागणारं नाणंही तोच मैदानावर घेऊन जातो. महत्त्वाचं म्हणजे सामन्यात विश्रांतीच्या वेळी मैदानावरील पंचांना शीतपेयं, पाणी आणि टॉवेल घेऊन जाण्याचं कामही चंपकच करतो. (IPL 2025, RCB vs RR)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.