IPL 2025, RCB vs RR : अखेर घरच्या मैदानावर बंगळुरूचं नशीब पालटलं, रंगतदार सामन्यात राजस्थानचा ११ धावांनी पराभव

१९व्या षटकांत ध्रुव जुरेलच्या बळीनंतर सामना फिरला.

238
IPL 2025, RCB vs RR : अखेर घरच्या मैदानावर बंगळुरूचं नशीब पालटलं, रंगतदार सामन्यात राजस्थानचा ११ धावांनी पराभव
IPL 2025, RCB vs RR : अखेर घरच्या मैदानावर बंगळुरूचं नशीब पालटलं, रंगतदार सामन्यात राजस्थानचा ११ धावांनी पराभव
  • ऋजुता लुकतुके

यंदाच्या आयपीएलमधील आतापर्यंतचा रंगतदार सामना गुरुवारी बंगळुरूकरांना बघायला मिळाला. आणि त्यांच्या सुदैवाने घरचा संघ जिंकला. किंबहुना या हंगामात पहिल्यांदाच घरच्या मैदानावर जिंकला. बंगळुरूने अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) ११ धावांनी मात केली. जोश हेजलवुडचे (Josh Hazlewood) ४ बळी आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) ७० धावा विजयासाठी निर्णायक ठरल्या. आणि हेजलवुडने १९ व्या षटकांत ध्रुव जुरेलचा (Dhruv Jurel) घेतलेला बळी सामन्याला कलाटणी देणारा ठरला. एरवी हा सामना दोलायमान अवस्थेत होता. बंगळुरूने पहिली फलंदाजी करत ५ बाद २०५ धावा केल्या होत्या. पण, राजस्थाननेही त्याला चोख उत्तर दिलं.

बंगळुरूच्या छोट्या पण, फसवी उसळी असलेल्या खेळपट्टीवर राजस्थानचे फलंदाज २०६ धावांचा पाठलाग करताना अजिबात गडबडले नाहीत. यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) पॉवरप्लेच्या ६ षटकांत फटकेबाजी करण्याचा मंत्र यशस्वीपणे जपला. पहिल्या ६ षटकांतच त्यांनी २ बाद ७२ अशी धावसंख्या गाठली. यशस्वी ४९ तर वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) १४ धावा करून बाद झाले. त्यानंतर नितीश राणा (२८) आणि रियान पराग (२२) यांनीही फटकेबाजी सुरूच ठेवली. आणि दहाव्या षटकांतच राजस्थानने ३ बाद ११० धावा केल्या होत्या. जोश हेजलवुड, भुवनेश्वर आणि यश दयाल या अनुभवी तेज गोलंदाजांना हे फलंदाज व्यवस्थीत खेळून काढत होते. इथे रजत पाटीदारने दोन्ही बाजूंनी कृणाल पंड्या (Krunal Pandya) आणि सुयश शर्माची (Suyash Sharma) फिरकी लावली. आणि त्याने बंगळुरूला मोक्याचे बळी मिळाले. कृणालने नितिश राणा आणि रियान पराग हे दोन्ही बळी टिपले. बंगळुरूला विजयाची पहिली कुणकुण लागली ती इथेच. (IPL 2025, RCB vs RR)

(हेही वाचा – Pak Sports War : पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचं भारतातील प्रक्षेपण बंद !)

पण, राजस्थानचे सगळेच फलंदाज फटकेबाजीच्या मूडमध्ये होते. हेटमायरचा अपवाद वगळला तर त्यांच्या पहिल्या ७ फलंदाजांनी मिळून तब्बल १३ षटकार हाणले. त्यामुळे फलंदाजीचा त्यांचा वेग जास्त होता. त्यातच पाचव्या क्रमांकावर ध्रुव जुरेलने (Dhruv Jurel) ४७ धावा करत त्यांचं आव्हान बुलंद ठेवलं होतं. अशावेळी आपलं शेवटचं आणि सामन्यातील १९ वं षटक टाकताना जोश हेजलवुडने सामना फिरवला. या षटकांत त्याने ध्रुव जुरेलला बाद केलं. आणि पुढच्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरलाही झेलबाद केलं. आता राजस्थानवर उर्वरित एका षटकांत १७ धावा करण्याची वेळ आली. आणि तिथे पहिल्यांदा बंगळुरूच्या विजयाची खात्री वाटू लागली. हेजलवुडने एकूण ४ षटकांत ३३ धावा देत ४ बळी घेतले. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आता पर्पल कॅपच्या शर्यतीतही तो १६ बळींसह प्रसिद्ध कृष्णच्या बरोबर आहे. (IPL 2025, RCB vs RR)

(हेही वाचा – Crime News : तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी रॅपिडो बाईक चालकाला अटक !)

त्यापूर्वी बंगळुरूच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद २०५ धावा केल्या त्या विराट कोहली (Virat Kohli) आणि देवदत्त पडिक्कलच्या (Devdutt Padikkal) भागिदारीने. विराट आणि फिल सॉल्ट यांनी संघाला ६१ धावांची सलामी करून दिल्यानंतर सॉल्ट २२ धावांवर बाद झाला. पण, तिथून पुढे जवळ जवळ ९ षटकं विराट आणि पडिक्कल यांनी खेळून काढली. यात ९५ धावाही जमवल्या. विराट पुन्हा एकदा फॉर्ममध्ये होता. आणि ४२ चेंडूंत ७० धावा करताना त्याने २ षटकार आणि ८ चौकार ठोकले. तर पडिक्कलने २७ चेंडूंत ५० धावा जमवल्या. टीम डेव्हिडने २३ तर जितेश शर्माने २२ धावा करत बंगळुरूला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. (IPL 2025, RCB vs RR)

बंगळुरूने आता ९ सामन्यांत ६ विजय मिळवत १२ गुणांची कमाई केली आहे. आणि गुणतालिकेत तिसरं स्थान मिळवलं आहे. तर राजस्थान रॉयल्स संघ ४ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. बंगळुरूचा पुढील सामना फॉर्मात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सशी दिल्लीत होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.