-
ऋजुता लुकतुके
पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ निर्धारित १४ षटकांत ९ बाद ९५ धावाच करू शकला. यात कर्णधार रजत पाटीदारने १८ चेंडूंत २३ धावांचं योगदान दिलं. टीम डेव्हिडने २६ चेंडूंत ५० धावा केल्यामुळे बंगळुरूने निदान ९५ धावा गाठल्या. नाहीतर इतर फलंदाज एकेरी धावसंख्येवरच बाद झाले होते. आधीच पावसामुळे सामन्याचा दीड तास वाया गेला. त्यामुळे सामना प्रत्येकी १४ षटकांचा करावा लागला आणि त्यानंतर पावसामुळे धिम्या झालेल्या आऊटफिल्डवर सुरुवातीला बंगळुरूच्या फलंदाजांना धावा जमवणं कठीण जात होतं. (IPL 2025, RCB vs PBKS)
पंजाबलाही ९५ धावांचा लाठलाग करणं तितकंसं सोपं गेलं नाही आणि पहिले ४ फलंदाज त्यांनी ५० धावांच्या आत गुंडाळले होते. हेझलवूडने १४ धावांत ३ बळी मिळवत पंजाबला खिळ घातली होती. पण, नेहल वडेराने सहाव्या क्रमांकावर येत २२ चेंडूंत ३३ धावा केल्या आणि यात ३ षटकार ठोकून बंगळुरूची विजयाची थोडीफार आशाही धुळीला मिळवली. बंगळुरूची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. पण, कर्णधार रजत पाटीदारने या दरम्यान आयपीएलमधील एक मोलाचा मापदंड ओलांडला. या लीगमधील १,००० धावा त्याने पूर्ण केल्या आणि त्याही जलद वेगाने. सगळ्यात वेगवान १,००० धावा पूर्ण करणारा तो दुसरा जलद फलंदाज आहे आणि सचिन तेंडुलकरच्याही तो पुढे आहे. फक्त ३० डावांमध्ये त्याने ही कामगिरी केली आहे. (IPL 2025, RCB vs PBKS)
(हेही वाचा – Affordable Homes : देशातील आठ शहरांमध्ये कसे आहेत घरांचे भाव? कुठे भाव वाढतायत, कुठे होतायत कमी?)
Not giving anything away 🙅@PunjabKingsIPL bowling attack has been top notch so far in the season 👌#TATAIPL | #RCBvPBKS pic.twitter.com/9sBNA2EHjx
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2025
गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनने हा टप्पा सगळ्यात कमी म्हणजे २५ डावांमध्ये पूर्ण केला आहे. तर सचिन तेंडुलकर आणि ऋतुराज गायकवाड (प्रत्येकी ३१ डाव) यांना आता रजत पाटीदारने मागे टाकलं आहे. मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माने १००० धावांसाठी ३३ डाव घेतले. या पराभवानंतर गुणतालिकेत बंगळुरूचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. ७ सामन्यांत त्यांनी ४ विजय मिळवले आहेत. तर तीनदा त्यांचा पराभव झालाय. तर पंजाबचा संघ ७ सामन्यांत ५ विजयांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गुजरात टायटन्स आपलं अव्वल स्थान टिकवून आहेत. (IPL 2025, RCB vs PBKS)
विशेष म्हणजे रविवारी २० एप्रिलला हेच दोन संघ पुन्हा आमने सामने येणार आहेत. यावेळी सामना पंजाब किंग्जचं घरचं मैदान मुल्लनपूरला होणार आहे. हा सामना दुपारी साडे तीन वाजता सुरू होईल. (IPL 2025, RCB vs PBKS)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community