ऋजुता लुकतुके
लखनौच्या (RCB vs LSG) २२७ धावांचा सामना करताना बंगळुरूची अवस्था १२ व्या षटकात ४ बाद १२४ झाली तेव्हा संघाला दोन धक्के बसले. एकतर मोठा पाठलाग असताना चौथा गडी बाद झाला. आणि तो गडी विराट जम बसलेला विराट कोहली होता. त्यामुळे क्षणभर सामनाच बंगळुरूच्या हातातून निसटला असा सगळ्यांचा समज झाला. पण, विराटच्या जागी बदली कर्णधार जितेश शर्मा आला तो एक मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन. रजत पाटिदार जायबंदी असल्यामुळे फक्त फलंदाजीसाठी मैदानात उतरतोय. आणि त्याच्याजागी नेतृत्व करणाऱ्या जितेशने उर्वरित १०४ धावा त्या ही ११ पेक्षा जास्त धावगतीने करण्याचं आव्हान शीरावर घेतलं. (RCB vs LSG)
हेही वाचा-Veer Savarkar : भारताची युद्धजन्य स्थिती आणि सावरकरांचे सैनिकी धोरण
पहिल्या चेंडूपासूनच त्याने चौकाराने सुरुवात केली. आणि त्यानंतर मयांक अगरवालच्या समर्थ साथीने त्याने बंगळुरूला विजय तटावर नेलं. ३३ चेंडूंत नाबाद ८५ धावा करताना त्याने ६ उत्तुंग षटकार आणि ८ चौकार ठोकले. आणि हे सगळे फटके अगदी सुरक्षित होते. लखनौच्या फलंदाजांनी एकदा दिलेलं जीवनदान सोडलं तर जितेशची खेळी अगदीच निखळ होती. या कामगिरीसह भारतीय संघातही यष्टीरक्षकाच्या जागेवर त्याने नकळतपणे दावा ठोकला आहे. बंगळुरूने हा सामना ८ चेंडू आणि ६ गडी राखून जिंकला. आणि १९ गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं. त्यामुळे आता पहिल्या पात्रता सामन्यात त्यांची गाठ पंजाब किंग्जशी पडणार हे निश्चित झालं आहे. (RCB vs LSG)
हेही वाचा- Mumbai Police : शेळीपालनाच्या नावाखाली रायगड जिल्ह्यात ड्रग्सची फॅक्टरी, मुंबई पोलिसांकडून कारवाई
विराट कोहलीच्या ५४, फील सॉल्टच्या ३०, मयांक अगरवालच्या नाबाद ४१ योगदानांनीही बंगळुरूच्या पाठलागात रंग भरले. पण, रजत पाटिदार (१४) आणि लियम लिव्हिंगस्टोन (०) यांच्या लागोपाठच्या चेंडूंवर गेलेल्या बळीमुळे सामन्यात काही काळ निर्माण झालेली रंगत सोडली तर एरवी बंगळुरूने अगदी समर्थपणे धावसंख्येचा पाठलाग केला. जितेश शर्माला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. (RCB vs LSG)
For his scintillating match winning 33-ball 85*, Jitesh Sharma receives the Player of the Match award 👏
Relive his knock ▶ https://t.co/WTKKaGgSV5 #TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/4z51CIo7H5
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025
जितेशच्या खेळीने खरंच सामन्याचा नूरच पालटला. त्याने धावगतीचं दडपण संघाला येऊ दिलं नाही. दुसऱ्या बाजूने भक्कम साथ देणाऱ्या मयंकला त्याने आपला नैसर्गिक खेळ करण्याची मुभा दिली. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा संघाला गरज होती, हुकमी चौकार आणि षटकार ठोकले. लखनौच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा त्याने चौफेर फायदा उचलला. (RCB vs LSG)
हेही वाचा- Pahalgam Attack मधील 26 मृतांचे स्मारक बांधणार ; जम्मू-काश्मीरच्या मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
त्यापूर्वी लखनौ संघाने या हंगामातील आपला सर्वोत्तम डाव खेळताना निर्धारित २० षटकांत ३ बाद २२७ धावा केल्या त्या कर्णधार रिषभ पंतच्या दिमाखदार शतकामुळे ६१ चेंडूंत नाबाद ११८ धावा करत त्याने खेळाडूची गुणवत्ताच श्रेष्ठ असते हे दाखवून दिलं. त्याला मिचेल स्टार्कने ६७ धावा करत चांगली साथ दिली. पण, अखेर बंगळुरूने हा सामना जिंकत गुणतालिकेत दुसरं स्थान निश्चित केलं. (RCB vs LSG)
आता येत्या २९ मे ला पहिला पात्रता सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान मुल्लनपूर इथं होणार आहे. तर एलिमिनेटरचा सामना ३० मेला याच मैदानावर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स दरम्यान होईल. (RCB vs LSG)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community