IPL 2025, RCB vs DC : विराट कोहलीचं कांतारा स्टाईलने सेलिब्रेशन; के. एल. राहुलशी पुन्हा बाचाबाची

IPL 2025, RCB vs DC : राहुलने बंगळुरूमध्ये सामना जिंकल्यावर असंच सेलिब्रेशन केलं होतं.

96
IPL 2025, RCB vs DC : विराट कोहलीचं कांतारा स्टाईलने सेलिब्रेशन; के. एल. राहुलशी पुन्हा बाचाबाची
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघातली दोन खेळाडू के. एल. राहुल आणि विराट कोहली यांच्यात या आठवड्यात एक वेगळंच द्वंद्व रंगलं होतं. बंगळुरू हे के. एल. राहुलचं शहर. पण, तो यंदा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय आणि बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानात नाबाद ९३ धावा करत जेव्हा त्याने दिल्लीला सामना जिंकून दिला, तेव्हा त्याने मैदानातच जंगी सेलिब्रेशन केलं होतं. बॅट खेळपट्टीवर रोवून हे माझं मैदान आहे, असं तो सुचवत होता. त्याच्या पुढच्याच आठवड्यात रविवारी दोन्ही संघ पुन्हा आमने सामने आले. यावेळी मैदान होतं दिल्लीचं अरुण जेटली स्टेडिअम. यावेळी विराटची फ्रँचाईजी बंगळुरू पण, दिल्ली त्याचं घरचं मैदान अशी परिस्थिती होती. त्यामुळे हा सामना दोघांमधील बदल्याचा सामना म्हणून पाहिला जात होता. विराटने इथं विजय मिळवला तर तो कसं सेलिब्रेशन करणार याच्या चर्चा आधीच रंगल्या होत्या. विराटने ३ बाद २५ वरून संघाला विजय मिळवून दिला. नंतर सेलिब्रेशनही केलं. कांतारा स्टाईलने त्याने विजयाचा जल्लोष केला. (IPL 2025, RCB vs DC)

सामन्यादरम्यान राहुल आणि विराटमध्ये दोनदा किरकोळ वादही झाला. सामना संपला तेव्हा विराट ५४ वर बाद झालेला होता. तो दिल्लीच्या खेळाडूंना भेटायला गेला. राहुल आणि करुण नायर एकमेकांशी गप्पा मारत होते. विराट तिथे गेला. आणि त्याने बॅट दोघांसमोर मैदानात रोवून आपला आनंद दाखवला. राहुलनेही ते खेळीमेळीने घेतलं आणि खेळपट्टीकडे इशारा करत तिथे हा जल्लोष दाखव, असं विराटला सांगितलं. यावर सगळेच हसले. (IPL 2025, RCB vs DC)

(हेही वाचा – संकटसमयी Sharad Pawar करणार महाआरती!)

कृणाल पांड्याच्या नाबाद ७३ धावा आणि त्याने विराटबरोबर केलेली १२४ धावांची भागिदारी यामुळे बंगळुरू संघाने हा विजय साकारला. गुणतालिकेतही त्यांनी अव्वल स्थानावर झेप घेतली. दरम्यान, बंगळुरूची फलंदाजी सुरू असताना विराट आणि राहुल यांच्यात एकदा छोटासा वाद झाल्याचंही दिसलं. नेमकं कारण समजू शकलं नाही, कारण, दोघंही स्टंप कॅमेरापासून दूर होते. पण, विराट राहुलकडे जाब मागताना दिसला. (IPL 2025, RCB vs DC)

(हेही वाचा – मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा कॉंग्रेसच्या नेत्यावर पलटवार; म्हणाले, ‘जखमेवर मीठ चोळायची कामे करू नका’   )

दिल्लीच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूची अवस्था ३ बाद २६ अशी झाली होती. पण, विराट (५४) आणि कृणाल (नाबाद ७३) यांनी चौथ्या गड्यासाठी ११९ धावांची भागिदारी करत बंगळुरूला विजयी केलं. अरुण जेटली स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीला फारशी पोषक नव्हती. पण, परिस्थितीचं भान ठेवत विराटने फटकेबाजीलाही आळा घातला. या हंगामातील पाचवं अर्धशतक पूर्ण करताना ऑरेंज कॅपही नावावर केली आहे. तर बंगळुरूच्याच जोस हेझलवूडने १८ बळींसह आता पर्पल कॅप नावावर केली आहे. (IPL 2025, RCB vs DC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.