
-
ऋजुता लुकतुके
आयपीएलमध्ये सुरुवातीपासून घरचं मैदान आणि बाहेरचं मैदान अशी संकल्पना राबवण्यात आली आहे. घरच्या मैदानावर प्रेक्षकांचा पाठिंबा जास्त मिळतो. त्यामुळे इथं जिंकणं तुलनेनं सोपं हे ओघाने आलंच. पण, यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचाईजीने या बाबतीत अनोखा विक्रम रचला आहे. त्यांनी घरच्या मैदानावर नाही तर प्रतिस्पर्ध्यांच्या गोटात जाऊन सातच्या सात सामने जिंकले आहेत. ही कामगिरी करणारा तो आयपीएलच्या इतिहासातील पहिला संघ आहे. (IPL 2025, RCB in Top 2)
हंगामी कर्णधार जितेश शर्माने नाबाद ८५ धावा करत लखनौच्या २२७ धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची धमक बंगळुरूला दिली. त्यातून हा विक्रम साकार झाला. लखनौच्या एकाना स्टेडिअमवर बंगलुरूने लखनौविरुद्घचा सामना ६ गडी आणि ८ चेंडू राखून जिंकला. बंगळुरूने आयपीएलमध्ये दुसऱ्या डावांत केलेली ही सगळ्यांत मोठी विजयी धावसंख्या आहे. तर आयपीएलच्या इतिहासातील तिसरा मोठा यशस्वी पाठलाग आहे. १४ सामन्यांमध्ये १९ गुण मिळवून बंगळुरूच्या संघाने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. अव्वल असलेल्या पंजाब किंग्जपेक्षा त्यांची धावगती ०.३० नी कमी आहे. (IPL 2025, RCB in Top 2)
(हेही वाचा – वीर सावरकरांचा त्याग राष्ट्रासाठी प्रेरणादायक; Amit Shah यांची एक्सवर भावूक पोस्ट)
𝙅𝙖𝙯𝙯𝙮 𝙅𝙞𝙩𝙚𝙨𝙝 😎
An absolute masterclass 👏#RCB fans, a word for your captain 👇
Updates ▶ https://t.co/h5KnqyuYZE #TATAIPL | #LSGvRCB | @RCBTweets pic.twitter.com/Z4GN9RoRKB
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025
जितेश शर्माने आयपीएलमधील आपलं पहिलंच अर्धशतक झळकावताना ३३ चेंडूंतच नाबाद ८५ धावा केल्या. यात ६ षटकार आणि ८ चौकारांची आतषबाजी केली. त्यापूर्वी विराट कोहली आणि फील सॉल्ट यांनी संघाला चांगली पायाभरणी करून दिली होती. विराटने २९ चेंडूंत ५४ धावा केल्या. यात त्याने १० चौकार ठोकले. तर सॉल्टने तडाखेबाज ३० धावा केल्या. दोन्ही सलामीवीरांनी धावगती कायम किमान १० च्या वर राहील याची दक्षता घेतली. (IPL 2025, RCB in Top 2)
तर विराट बाद झाल्यावर संघाची धावसंख्या ४ बाद १२३ असताना जितेश आणि मयांक अगरवाल ही जोडी जमली. दोघांनी नाबाद शतकी भागिदारी करताना बंगळुरूला अवघड विजय मिळवून दिला. याच सामन्यात लखनौच्या विल ओ-रुर्कच्या गोलंदाजीवर ४ षटकांत तब्बल ७४ धावा निघाल्या. ही आयपीएलमधील तिसरी सर्वात खराब गोलंदाजी ठरली आहे. तर लखनौमध्ये फक्त दुसऱ्यांदा दोनशे पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग झाला आहे. (IPL 2025, RCB in Top 2)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community