IPL 2025, RCB in Final : यजुवेंद्र चहल पहिल्या पात्रता सामन्यात का खेळला नाही?

IPL 2025, RCB in Final : चहलची अनुपस्थिती पंजाब किंग्जला जाणवली. 

46
IPL 2025, RCB in Final : यजुवेंद्र चहल पहिल्या पात्रता सामन्यात का खेळला नाही?
  • ऋजुता लुकतुके

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिला पात्रता सामना जिंकून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पंजाब किंग्जला त्यांनी ८ गडी आणि तब्बल ६० चेंडू राखून हरवलं. बाद फेरीत एखाद्या संघाने मिळवलेला आता आतापर्यंतचा सगळ्यात मोठा विजय आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही संघांचे कर्णधार मैदानात उतरले तेव्हा एक ठळक गोष्ट समोर आली. बंगळुरूच्या ताफ्यात अनुभवी तेज गोलंदाजी जोश हेझलवूड परतला होता. तर पंजाबच्या अंतिम यादीत आताही यजुवेंद्र चहल नव्हता. चहल पंजाबचा सगळ्यात अनुभवी गोलंदाज तर आहेच. शिवाय आतापर्यंतचा त्यांचा सगळ्यात यशस्वी फिरकी गोलंदाजही आहे. (IPL 2025, RCB in Final)

(हेही वाचा – “जर दहशतीचा कणा पुन्हा उभा राहिला तर…” ; PM Modi यांचा पाकला सूचक इशारा)

पण, आधीच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही चहल खेळू शकला नव्हता. आताही सुरुवातीपासून त्याचं नाव खेळाडूंच्या यादीत नव्हतं. चहलच्या हाताच्या बोटाला छोटीसी दुखापत झाली आहे. मुंबई आधी सराव करताना तो बोटाला पट्टी लावून मैदानात उतरलेला दिसला. दुखापत फारशी गंभीर नसली तरी दुसऱ्या पात्रता फेरीत तो खेळू शकेल का हे अजूनही स्पष्ट नाही. पंजाब संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी मुंबईच्या सामन्यानंतर चहलच्या दुखापतीची कल्पना पत्रकारांना दिली होती. तो लवकरच सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. आताही चहल संघाबरोबर दिसला. पण, त्याने सरावात भाग घेतला नाही. (IPL 2025, RCB in Final)

(हेही वाचा – Veer Savarkar Defamation Case : पळपुट्याची विनाशकाले विपरीत बुद्धी…)

गेल्या हंगामात चहल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होता. पण, त्यांनी मेगा लिलावापूर्वी चहलला मुक्त केलं. पंजाब किंग्जनी १८ कोटी रुपये देऊन त्याला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. या हंगामात त्याने आतापर्यंत १२ सामन्यांत १४ बळी मिळवले आहेत. मार्को यानसेन (१६) आणि अर्शदीप सिंग (१८) यांच्या मागोमाग त्याचा क्रमांक लागतो. पंजाब किंग्जचा पुढील सामना १ जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. (IPL 2025, RCB in Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.