IPL 2025, RCB in Final : २०१६ नंतर पहिल्यांदाच बंगळुरू संघ अंतिम फेरी गाठतो तेव्हा….

IPL 2025, RCB in Final : विजयासाठी आवश्यक १०२ धावा संघाने १० षटकांतच केल्या

46
IPL 2025, RCB in Final : २०१६ नंतर पहिल्यांदाच बंगळुरू संघ अंतिम फेरी गाठतो तेव्हा….
IPL 2025, RCB in Final : २०१६ नंतर पहिल्यांदाच बंगळुरू संघ अंतिम फेरी गाठतो तेव्हा….

ऋजुता लुकतुके

पंजाब किंग्जला १४.१ षटकांत १०१ धावांमध्ये गुंडाळलं, तेव्हाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अंतिम फेरीतील (RCB in Final) प्रवेश निम्मा साध्य झाला होता. पण, तरीही विराट कोहली आणि फील सॉल्ट ही त्यांची आघाडीची जोडी मैदानात उतरली ती एका इराद्यानेच. विराटने अर्शदीपच्या पहिल्या षटकांत १० धावा वसूल केल्या आणि त्यांना वेळ गमावायचा नाही हे स्पष्ट केलं. पुढे विराट १२ धावा करून बाद झाला. पण, फील सॉल्टने २७ चेंडूंत नाबाद ५४ धावा करत बंगळुरूला बरोबर १० षटकांत हा सामना जिंकून दिला. ९ वर्षांनंतर पहिल्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला. (RCB in Final)

२ षटकार आणि ७ चौकारांसह सॉल्टने बंगळुरूला सुरक्षितपणे अंतिम फेरीत पोहोचवलं. बंगळुरू फ्रँचाईजीने ६० चेंडू राखून मिळवेलला हा विजय चेंडूंचा विचार करता बाद फेरीत मिळवलेला सगळ्यात मोठा विजय आहे. गेल्यावर्षी अंतिम फेरीत कोलकाताने ५७ चेंडू राखून विजय मिळवला होता. तो विक्रम मोडीत निघाला आहे. (RCB in Final)

त्याचबरोबर आणखीही काही विक्रम मोडीत निघाले. यापूर्वी २००९. २०११ आणि २०१६ अशा तीनदा बंगळुरू संघाने अंतिम फेरी गाठली आहे. आणि शेवटच्या २०१६ मध्ये तर फक्त ५ धावांनी त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे यंदा विजेतेपदात त्यांना कसलीही कसूर सोडायची नाही. त्यामुळेच संघ विजयाचा जल्लोष करण्यापेक्षा शांत राहून अंतिम फेरीचा विचार करतानाच दिसला. (RCB in Final)

दुसरीकडे, पंजाब किंग्जचा संघ २०१४ नंतर पहिल्यांदाच बाद फेरीत पोहोचला आहे. आणि दुसरा पात्रता सामना खेळण्याची आणखी एक संधी त्यांना मिळणार आहे. (RCB in Final)

१०० पेक्षा जास्त धावांचा अतीजलद पाठलाग करण्याच्या बाबतीत बंगळुरूचा संघ आता तिसऱ्या स्थानावर आहे.

९.४ षटकं – बंगळुरू वि. कोलकाता, बंगळुरू, २०१५ (पावसाचा व्यत्यय)

९.४ षटकं – हैद्राबाद वि. लखनौ, हैद्राबाद, २०२४ (लक्ष्य – १६६)

१० षटकं – बंगळुरू वि. पंजाब, मुल्लानपूर, २०२५ (लक्ष्य – १०२)

१०.१ षटकं – कोलकाता वि. चेन्नई, २०२५ (लक्ष्य – १०४)

बाद फेरीत दोन पात्रता सामने आणि एक एलिमिनेटर सामना अशी रचना सुरू झाल्यापासून १४ पैकी ११ वेळा पहिला पात्रता सामना जिंकलेला संघ विजेता झाला आहे. त्यामुळे यंदा सगळ्यांची नजर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर असणार आहे. (RCB in Final)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.