IPL 2025, RCB Champions : या हंगामात ऑरेंज, पर्पल कॅप कुणाची? कुणी मारले सर्वाधिक षटकार?

IPL 2025, RCB Champions : आकडेवारीच्या माध्यमातून आयपीएल २०२५ समजून घेऊया. 

76
IPL 2025, RCB Champions : विराटच्या आईने असा केला बंगळुरू विजयाचा आनंद साजरा
  • ऋजुता लुकतुके

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल जिंकल्यानंतर मंगळवारचा दिवस विराट कोहलीच्या भोवती फिरत राहिला. १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विराटच्या पदरात हे दान पडलं. आणि त्यामुळे विराटही सामन्यानंतर भावूक झाला होता. बुधवारी सकाळी त्याने नेमकेपणाने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये विराट चषकाला उद्देशून म्हणतो, ‘तू मला १८ वर्षं वाट पाहायला लावलीस!’ (IPL 2025, RCB Champions)

विराट आणि बंगळुरूसाठी हे विजेतेपद महत्त्वाचं होतंच. पण, लीगसाठीही. कारण, यंदा दोन नवीन संघ अंतिम फेरीत समोरासमोर आले. त्यामुळे लीगला एक नवीन विजेता मिळाला. तर चौकार आणि षटकारांचा विक्रम मोडीत निघाला. सर्वाधिक ८ वेळा २०० धावांचं लक्ष्यही पार झालं. युवा साई सुदर्शनने हंगामात सर्वाधिक धावा केल्या. तर १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सर्वात लहान शतकवीर ठरला. (IPL 2025, RCB Champions)

५ तक्त्यांच्या माध्यमातून या हंगामातील यशस्वी गोलंदाज आणि फलंदाजांसह इतर विक्रम समजून घेऊया, (IPL 2025, RCB Champions)

(हेही वाचा – Pakistani Spy : 3 वेळा पाकिस्तानात जाणाऱ्या पंजाबमधील आणखी एक युट्यूबरला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक ; ज्योती-दानिशशीही संबंध)

क्रमांक खेळाडू (संघ) सामने धावा सरासरी स्ट्राईक रेट सर्वोत्तम
1 साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) 15 759 54.21 156.17 104*
2 सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स) 16 717 65.17 167.91 73*
3 विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) 15 654 54.75 144.71 73

खेळाडू संघ सामने बळी सरासरी धावगती सर्वोत्तम
प्रसिध कृष्णन गुजरात टायटन्स १५ २५ १९.५२ ८.२७ ४/४१
नूर अहमद चेन्नई सुपर किंग्ज १६ २४ १७.०० ८.१६ ४/१८
जोश हेझलवूड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १२ २२ १७.५४ ८.७७ ४/३३
आयपीएलचा बाऊंडरी मीटर
  • षटकार – १२९४
  • चौकार – २२४५
आयपीएल २०२५ मधील सर्वोत्तम सांघिक धावसंख्या
  • सनरायझर्स हैद्राबाद – २८६/६
  • सनरायझर्स हैद्राबाद – २७८/३
  • सनरायझर्स हैद्राबाद – २४७/२
  • पंजाब किंग्ज – २४५/६
  • पंजाब किंग्ज – २४३/५

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.