IPL 2025, RCB Champions : श्रेयस अय्यर बाद झाल्यावर विराटने मारलेली उडी व्हायरल

श्रेयस अय्यर फक्त १ धाव करून बाद झाला.

143
IPL 2025, RCB Champions : श्रेयस अय्यर बाद झाल्यावर विराटने मारलेली उडी व्हायरल
IPL 2025, RCB Champions : श्रेयस अय्यर बाद झाल्यावर विराटने मारलेली उडी व्हायरल
  • ऋजुता लुकतुके

प्रतिस्पर्धी संघातील महत्त्वाचा फलंदाज बाद झाला की, संघाला विजयाचा अंदाज येतो. आयपीएलच्या (IPL 2025) अंतिम सामन्यात १९१ धावांचं लक्ष समोर असताना पंजाब किंग्जचा (Punjab Kings) कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दहाव्या षटकांत बाद झाला. आणि संघाची अवस्था ३ बाद ७९ अशी झाली. आधीच्या सामन्यात नाबाद ८७ धावा करणारा श्रेयस रोमारियो शेफर्डच्या (Romario Shepherd) गोलंदाजीवर जागच्या जागी चुकीचा फटका खेळून बाद झाला. आणि बंगळुरू संघाला विजयाची पहिली चाहूल तिथेच लागली. त्यामुळेच विराट कोहलीने (Virat Kohli) या बळीनंतर मैदानातच जोरदार आनंद साजरा केला. त्याने उंच उडी घेत गोलंदाज शेफर्डच्या दिशेनं झेप घेतली. आणि तो त्याला बिलगला. बंगळुरूने अखेर १८ वर्षांनंतर विजय साजरा केला. त्यामुळे त्यांच्या विजयाचे काही क्षण आता इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. त्यात विराटची ही उडी पहिल्या स्थानावर आहे.

रोमारियोचा चौथ्या, पाचव्या यष्टीवर असलेला हा आखूड टप्प्याचा चेंडू श्रेयसने जागीच उभा राहून मारला. चेंडू बॅटची कड घेऊन थेट यष्टीरक्षक जितेश शर्माकडे (Jitesh Sharma) गेला. मैदानावर आवाज झालाच. खेळाडूंनी अपीलही केलं. पण, पंचांनी सुरुवातीला बाद दिलं नव्हतं. पण, श्रेयसने स्वत:च मैदान सोडणं पसंत केलं. बंगळुरू संघाने पहिली फलंदाजी करताना ९ बाद १९० धावा केल्या. विराटने सर्वाधिक ४३ धावा केल्या. पण, त्यासाठी त्याने ३५ चेंडू घेतले. तो फक्त ३ चौकार मारु शकला. त्यामुळे संघ दोनशेच्या जवळ जातो की नाही असं एका क्षणी वाटत होतं. पण, पाटीदार १६ चेंडूंत २६, लिव्हिंगस्टोन १५ चेंडूंत २५ आणि जितेश शर्मा ७ चेंडूंत १७ यांनी बंगळुरूला निदान १९० धावांचा पल्ला गाठून दिला. (IPL 2025, RCB Champions)

(हेही वाचा – IPL 2025, RCB Champions : १८ वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजेतेपद, बंगळुरूत रस्त्या रस्त्यावर जल्लोष)

त्यानंतर प्रभसिमरन आणि प्रियांश यांनी पंजाबला चांगली सुरुवात करून दिली होती. पण, दोघंही मोठी खेळी करू शकले नाहीत. सामन्यातील तो क्षण १० व्या षटकांत आला. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) एकाच धावेवर बाद झाला. तिथून बंगळुरू संघाचा जल्लोष सुरू झाला. कृणाल पंड्याने (Krunal Pandya) आपली ४ षटकं टिच्चून मारा केला. फक्त १७ धावा देत त्याने प्रभसिमरन आणि जोश इंग्लिस (Josh Inglis) हे महत्त्वाचे दोन गडी बाद केले. पण, श्रेयस बाद झाल्यावर सोशल मीडियावर संदेशांचा पाऊस सुरू झाला. खासकरून विराटची उडी रात्रभर चर्चेत राहिली.

(हेही वाचा – MHADA च्या ९६ अतिधोकादायक इमारतींतील रहिवाश्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.